हिंगोलीमध्ये बापाने पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(victim) पीडित मुलगी गरोदर राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे हिंगोलीमध्ये खळबळ उडाली आहे. जीवे मारण्याची धमकी देत बापाने मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. याप्रकरणी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत हिंगोली पोलिसांनी त्याला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली. बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने बलात्कार केला. या धक्कादायक घटनेमुळे हिंगोलीत एकच खळबळ उडाली. (victim)बापाने सातत्याने केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली त्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला.

दरम्यान बाळापूर पोलिसांनी या प्रकरणात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःची पत्नी डोळ्याने अंध असल्याचा फायदा घेत या नराधम बापाने आपल्या लेकीलाच वासनेची शिकार बनवले. स्वतःच्या मुलीवर वारंवार बलात्कार करून बापाने मुलीला गरोदर केलं.(victim)बलात्काराची कबुली कुणाला दिली तर जिवे मारून टाकू अशी धमकी देखील हा नराधम बाप आपल्या मुलीला देत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सध्या पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे पीडित मुलीच्या अंध आईला देखील मोठा धक्का बसला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा :
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेता भाजपच्या वाट्यावर
‘त्याने माझ्याकडे पाहून पँटची चैन उघडली अन्…’; अभिनेत्रीसोबत मुंबईच्या रस्त्यावर घडला विचित्र प्रकार
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission