Hanooman AI भारतात लाँच; 98 भाषांमध्ये काम करणार अॅप
भारताचे स्वदेशी, बहुभाषिक आणि परवडणारे GenAI प्लॅटफॉर्म हनुमान(hanooman ai) 12 भारतीय भाषांसह जगातील 98 भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. ते शुक्रवारी लाँच करण्यात आले. या १२ भारतीय भाषांमध्ये हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, उडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि सिंधी यांचा समावेश आहे.
यासह Hanooman App(hanooman ai) इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, जर्मन, जपानी, कोरियन यासह जगभरातील इतर 80 भाषांमध्ये उपलब्ध असेल. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल जनरेटिव्ह AI व्यवसाय SML India ने अबू धाबी कंपनी 3AI होल्डिंगच्या भागीदारीत विकसित केले आहे. ते भारतात वेब आणि मोबाईल ॲपद्वारे वापरले जाऊ शकते.
अॅप असं डाऊनलोड करा
अँड्रॉईड युजर्स हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. हनुमान लवकरच iOS ॲप स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यांची प्रीमियम सबस्क्रिप्शन योजना या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाणार आहे.
SML इंडियाचे सह-संस्थापक आणि सीईओ विष्णु वर्धन म्हणाले, हनुमान भारतातील एआय इनोव्हेशनच्या नवीन युगाचे प्रतीक आहे. केवळ एका वर्षात २० कोटी युजर्सपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे. 80 टक्के भारतीयांना इंग्रजी येत नसल्याने हनुमानाचा वापर भारतीय भाषांमध्येही करता येणार आहे.
3AI होल्डिंगचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, हनुमान ॲप हे भारतातील प्रत्येक व्यक्तीला वापरता यावे यसाठी आहे. हनुमान भारतात आणि भारतीयांसाठी बनले आहेत.
ते पुढे म्हणाले, हनुमान ॲपचा डेटाही भारतातच साठवला जाणार आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, GenAI सह लोकांना सक्षम करून, आम्ही नाविन्यपूर्ण संधींचा उपयोग करू शकतो. यातून आपण देशाच्या विकासात हातभार लावू शकू.
हेही वाचा :
सलमान खानच्या बहिणीचा मोडणार संसार?, आयुष शर्माने सांगितलं मोठं सत्य
जरांगेंच्या रडारवर चंद्रकांतदादा पाटील, आता बघतोच कसा आमदार होतोय…
धोनीचा क्रेझी फॅन अचानक घुसला मैदानात… धरले ‘थला’चे पाय अन्…