लोकप्रिय आणि इंस्टट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे(WhatsApp) करोडो युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप प्रेम आणि भांडण दोन्हीचे कारण बनू शकते. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत बोलायचं असो किंवा तुमच्या पार्टनरसोबत, व्हॉट्सअॅप प्रचंड फायद्याचं ठरतं. पण जेव्हा भांडण होतं तेव्हा तुमचे मित्र किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करते. यानंतर खूप विनंत्या केल्यानंतरही आपल्याला अनब्लॉक केलं जात नाही. यामुळे आपण समोरच्या व्यक्तिला संपर्क करू शकत नाहीत आणि आपण नाराज होतो.

जर तुम्हालाही कोणी व्हॉट्सअॅपवर(WhatsApp) ब्लॉक केलं असेल तर अशा परिस्थितीत टेंशन घेण्याची गरज नाही. कारण कोणी तुम्हाला ब्लॉक असेल तर तुम्ही स्वत:च तुम्हाला अनब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
जर एखाद्या व्यक्तिने तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल असेल तर त्या चॅटमधून तुम्हीच स्वत:ला अनब्लॉक करू शकता. हे काम वाचायला जरी अशक्य वाटत असंल तरी तसं नाही. तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करायची आहे. तुम्हाला स्वत:ला अनब्लॉक करण्यासाठी तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करावं लागणार आहे. म्हणजे तुमचा सर्व डेटा डिलीट होणार आहे, पण या प्रोसेसमुळे तुम्ही स्वत:ला अनब्लॉक करू शकणार आहात.
तुम्हाला नव्याने तुमचं व्हॉट्सअॅप(WhatsApp) अकाऊंट सुरु करावं लागणार आहे. नव्याने अकाऊंट सुरु केल्यामुळे तुमचा सर्व जुना डेटा डिलीट होणार आहे. म्हणजेच आधीच्या चॅट्समधील चॅट्स, व्हिडीओ, फोटो आणि डेटा पूर्णपणे डिलीट होणार आहे. यामुळे एकाप्रकारे व्हॉट्सअॅप पूर्णपणे रिसेट होतो. एवढचं नाही तर तुम्ही सर्व ग्रुपमधून आपोआप बाहेर पडाल. जर तुम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार असाल, तर आता तुम्ही स्वतःला कसे अनब्लॉक करू शकता याची प्रोसेस जाणून घेऊया.

व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
-सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप ओपन करा.
-यानंतर सेटिंग ओपन करा आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा.
-इथे तुम्हाला Delete My Account चा ऑप्शन पाहायला मिळणार आहे.
-फोन नंबर एंटर केल्यानंतर “Delete My Account” वर क्लिक करा.
-अशा प्रकारे तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट आता डिलीट होणार आहे.
-यानंतर तुम्हाला फोनमधून व्हॉट्सअॅप Uninstall करावा लागणार आहे.
वर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही स्वत:च स्वत:ला अनब्लॉक करू शकता. वरील संपूर्ण प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप(WhatsApp) डाउनलोड कारावा लागणार आहे. आता पुन्हा एकदा नंबर एंटर करा. पुन्हा नव्याने संपूर्ण प्रोसेस फॉलो करा. आता कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असलेले सर्व नंबर दिसतील. ज्या नंबरने तुम्हाला ब्लॉक केले आहे तो नंबर देखील यामध्ये दिसू शकतो. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला अनब्लॉक करू शकाल.
हेही वाचा :
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी
गुड न्यूज! मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार? हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन
‘अटकेआधी एकनाथ शिंदेंनी मला फोन केला होता’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट