मी गॅरंटी देतो.. सलमानच्या लग्नाबाबत मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया
बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ अर्थात अभिनेता सलमान खान लग्न(marriage) कधी करणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. सलमानला याविषयी अनेकदा प्रश्न विचारला गेला, मात्र त्याने कधीच ठोस उत्तर दिलं नाही. आता अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानच्या लग्नाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. मिथुन यांनी ‘किक’ आणि ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटांमध्ये सलमानसोबत काम केलं होतं. जॅकी श्रॉफ, सलमान खान, संजय दत्त आणि अक्षय कुमार यांपैकी कोणी तुम्हाला सर्वाधिक त्रास दिला, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सलमानचं नाव घेतलं.
सलमानविषयी ते पुढे म्हणाले, “सलमान खूप मस्ती करतो. त्याच्या मनात माझ्याविषयी फार प्रेम आहे. आम्ही एकत्र असलो की तो एक मिनिटसुद्धा शांत राहत नाही. तो सतत मला शोधत असतो. मी झोपलो असेन तर मला उठवायला येतो. आम्ही रशियामध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होतो. तेव्हा तो मध्यरात्री 2 वाजता माझ्या रुममध्ये आला होता. तो कसा आला हे मला आजवर समजलेलं नाही. मी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा तो माझ्यासमोर हसत उभा राहिला होता. तो खूप मस्तीखोर आहे.”
सलमानच्या लग्नाविषयी ते पुढे म्हणाले, “सलमान कधीच लग्न(marriage) करणार नाही पण उगाच सर्वांना डोस (उपदेश) देत असतो. एखादीला वाटेल की किती हँडसम सुपरस्टार आहे, कदाचित तो माझ्याशी लग्न करेल. पण हा भाऊ कोणाशीच लग्न करणार नाही. मी याची गॅरंटी देतो की सलमान कधीच लग्न करणार नाही. पण अशा हँडसम मुलाच्या प्रेमात कोण पडू शकणार नाही सांगा मला?”
सलमानचं आजवर अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं अफेअर जगजाहीर आहे. त्यानंतर त्याने काही काळ अभिनेत्री कतरिना कैफला डेट केलं होतं. कतरिनाशी ब्रेकअप केल्यानंतर त्याचं नाव मॉडेल लुलिया वंतूरशी जोडलं गेलं होतं. हे दोघं पनवेलच्या फार्महाऊसमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे, असंही म्हटलं गेलं होतं. मात्र या नात्याबद्दल दोघं कधीच मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने काही दिवसांपूर्वीच आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा :
द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच
अरविंद केजरीवाल यांना दिलासा! ऐन निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन
काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं; भरसभेतून PM मोदींची शरद पवार आणि ठाकरेंना ऑफर