१ नोव्हेंबर २०२५ पासून आधार कार्डशी (Aadhaar card)संबंधित नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत. या बदलांमुळे आधार धारकांना अनेक सोयी उपलब्ध होणार आहेत. आता आधारमधील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर यांसारखी माहिती अपडेट करण्यासाठी नामांकन केंद्रात जाण्याची गरज राहणार नाही. नागरिक आता घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून ही माहिती सहज बदलू शकतील. यूआयडीएआयनं ही नवी सुविधा आधारला अधिक सोपी, जलद आणि सुरक्षित बनवण्यासाठी सुरू केली आहे. नागरिकांनी दिलेली नवी माहिती पॅन, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्डसारख्या सरकारी दस्तऐवजांशी आपोआप पडताळून पाहिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनेल.

यासोबतच आधार अपडेट करण्यासाठी लागणाऱ्या शुल्कांमध्येही बदल करण्यात आला आहे. नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता ₹७५ आकारले जातील, तर फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅनिंग किंवा फोटो अपडेट करण्यासाठी ₹१२५ द्यावे लागतील. ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट विनामूल्य राहील. ऑनलाइन दस्तऐवज अपडेटची सुविधा १४ जून २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध असेल, मात्र केंद्रावरून केल्यास ₹७५ शुल्क लागेल. आधारची प्रिंट काढण्यासाठी ₹४० तर घरपोच नामांकनासाठी पहिल्या व्यक्तीस ₹७०० आणि त्याच पत्त्यावर प्रत्येक अतिरिक्त व्यक्तीस ₹३५० शुल्क आकारले जाईल.

दरम्यान, आधार(Aadhaar card) आणि पॅन कार्ड लिंक करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक पॅन धारकाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आपले पॅन आधारशी जोडणे आवश्यक आहे. अन्यथा १ जानेवारी २०२६ पासून अपूर्ण लिंक असलेले पॅन कार्ड निष्क्रिय होईल. नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांनाही आधार पडताळणी करावी लागेल. याशिवाय, बँका आणि वित्तीय संस्थांसाठी केवायसी प्रक्रिया देखील अधिक सोपी करण्यात आली आहे. आता केवायसीसाठी आधार ओटीपी, व्हिडिओ केवायसी किंवा प्रत्यक्ष पडताळणीचा वापर करता येईल, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस आणि वेगवान होईल.

या बदलांमुळे देशातील लाखो आधार धारकांना मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही, तर काही मिनिटांतच आवश्यक माहिती घरबसल्या अपडेट करता येईल. यूआयडीएआयच्या या नव्या नियमांमुळे वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार असून प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. मात्र, पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे, अन्यथा आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी वेळेत आपले आधार आणि पॅन जोडून घ्यावेत आणि नवीन ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा.

हेही वाचा :

शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील पुलाजवळ तरुणाची निर्घृण हत्या…

बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या

 फडणवीसांचा दोन्ही पवारांना मोठा धक्का…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *