कुरुंदवाड परिसर पुन्हा एकदा खळबळून गेला आहे. दानवाड (ता. शिरोळ) आणि एकसंबा दरम्यानच्या दूधगंगा नदीवरील पुलालगत सोमवारी (दि. २७) सकाळी एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या(murder) करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सीमाभागात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी हा नियोजित खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

सकाळी स्थानिक नागरिक पुलावरून जात असताना त्यांना नदीपात्राच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी त्वरित सदलगा पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवकुमार बिरादार आणि कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून, घटनास्थळ पाहता ही हत्या पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या हातात चांदीचा कडा होता, अंगावर कॉलर नसलेला क्रीम रंगाचा टी-शर्ट, त्यावर काळे स्पोर्ट्स जॅकेट, तसेच मेहंदी रंगाची नाईट पँट होती. उंची अंदाजे ५ फूट ९ इंच, रंग सावळा आणि डोक्यावर थोडे लांब केस असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. घटनास्थळ कर्नाटक सीमेच्या अगदी जवळ असल्याने, हत्या महाराष्ट्रात झाली की कर्नाटकात — हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सदलगा पोलीस ठाण्याच्या पथकांनी दोन्ही राज्यांमध्ये सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

दरम्यान, गेल्या सहा दिवसांत शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर परिसरात आणि कृष्णा नदीपात्राजवळ दोन खुनांच्या घटना घडल्या होत्या. आता या तिसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये (murder)अशांतता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदलगा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनाशी जुळणारी कोणतीही बेपत्ता व्यक्ती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच कुरुंदवाड पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा आणि राज्यातील बेपत्ता प्रकरणांची तपासणी सुरू केली आहे. सदलगा पोलीस निरीक्षक बिरादार यांनी महाराष्ट्र व कर्नाटकात चार विशेष पथके रवाना करून तपासाला वेग दिला असून, या हत्येच्या मागील कारणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा :
बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या
फडणवीसांचा दोन्ही पवारांना मोठा धक्का…
आजचा मंगळवार ‘या’ राशींसाठी भाग्याचा…