चिंता वाढली! कोरोनाचा नवा व्हेरियंट NB.1.8.1 पूर्वीपेक्षा धोकादायक; भारतात रुग्णसंख्या वाढली

कोरोनाचा(Corona) नवा आणि अधिक धोकादायक व्हेरियंट NB.1.81 पुन्हा एकदा संपूर्ण जगात भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. भारतातही या नव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असून सध्या १,००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. जगभरात पुन्हा एकदा कोविड-१९ चा धोका वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे.

अमेरिकेच्या आरोग्य विभागाने NB.1.81 या नव्या व्हेरियंटचा(Corona) शोध घेतल्याची माहिती दिली असून, तो पूर्वीच्या सर्व व्हेरियंट्सपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि जीवघेणा असल्याचंही स्पष्ट केलं आहे. या व्हेरियंटबद्दल चीनने माहिती लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, तिथूनच या नव्या प्रकाराचा प्रसार सुरु झाल्याचा दावा अमेरिकन तज्ज्ञांनी केला आहे.

NB.1.81 व्हेरियंट सिंगापूर, जपान, फ्रान्स, स्पेन, तैवान आणि अमेरिका यासारख्या देशांमध्येही झपाट्याने पसरतो आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य देशांच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने वेग घेतला असून, दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढते आहे. अनेक राज्यांमध्ये संसर्ग नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी सतर्क राहण्याचे आणि कोरोना प्रतिबंधक नियम पुन्हा काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.

NB.1.81 व्हेरियंटच्या उद्रेकामागे चीनची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. चीनने यासंदर्भातील प्राथमिक माहिती जगासमोर उघड केली नसल्यामुळे अनेक देशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चीनमधील अनेक भागांमध्येही रुग्णसंख्येत वाढ झाली असून, सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

कोरोनाबाबत जपानच्या बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरणार खरी?

लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

लवकरच जबरदस्त राजयोग बनणार! ‘या’ 5 राशी अमाप संपत्तीच्या धनी होतील…