ग्राहकांना दिलासा! सलग दोन दिवसाच्या चकाकीनंतर सोन्याची झळाळी उतरली

सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. (prices)त्यामुळे सोने खरेदी करायचे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. दरम्यान, त्यात ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे. परंतु आज सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.२४ कॅरेट सोने प्रति तोळा ९६,०६० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७६,८४८ रुपये झाली आहे. दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमती वाढत आहे. (prices)आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याचे भाव घसरले आहे.२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ५४० रुपये प्रति तोळा घसरण झाली आहे.

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ८८,०५० रुपये प्रति तोळा आहे. यामध्ये ५०० रुपयांनी घसरण झाली आहे. काल हे दर ८८,५५० रुपये होते. ८ ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला ७०,४४० रुपये मोजावे लागणार आहे. या दरातदेखील घट झाली आहे. आज १८ कॅरेट सोने प्रति तोळा ७२,०४० रुपये झाली आहे. (prices)तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,६३२ रुपये झाली आहे. सोन्याची किंमत ४१० रुपयांनी कमी झाली आहे.सोन्याचे भाव जरी वाढत असले तरी चांदी मात्र स्थिर आहे. चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ८ ग्रॅम चांदी ७८३.२० तर १० ग्रॅम चांदी ९७९ रुपयांवर विकली जात आहे. चांदी किंमत स्थिर आहे मात्र, हे दरदेखील मध्येच वाढतात.

हेही वाचा :

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी मेगाभरती 

एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असणारांसाठी मोठी आनंदाची बातमी!

पक्ष तोडण्याची लायकी पाकिस्तान तोडण्याची नाही संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र