रितेश देशमुख हळहळला! ‘राजा शिवाजी’च्या कलाकाराचा मृत्यू

सध्या अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख(shooting) यांच्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे चित्रीकरण साताऱ्यात सुरू आहे. मात्र, शूटिंगदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून युनिटमधील एक ज्युनिअर आर्टिस्ट नदीत बुडून मरण पावला आहे. या घटनेने संपूर्ण टीमवर शोककळा पसरली असून रितेश देशमुखने काही काळासाठी चित्रीकरण थांबवले आहे.घटनेतील मृत व्यक्तीचे नाव सौरभ शर्मा असून तो राजस्थानच्या जोधपूर येथून आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईत आला होता. तो या चित्रपटात डान्स आर्टिस्ट म्हणून काम करत होता. घटनेनंतर मुंबई फिल्म कंपनीने अधिकृत निवेदन जाहीर करत घटनेला दुजोरा दिला आहे.

22 एप्रिल रोजी संध्याकाळी पॅकअपनंतर काही कलाकार नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. हळदीच्या सीनमुळे अंगावर हळद लागल्याने अंघोळीसाठी हे कलाकार नदीत उतरले. मात्र, नदीत असलेल्या भोवऱ्याचा अंदाज न आल्याने सौरभ वाहून गेला. त्या जागी तीन खोल भोवरे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.घटना कळताच रितेश देशमुख, जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा यांनी तातडीने घटनास्थळी (shooting)धाव घेतली. स्थानिक पोहणारे, ड्रोन आणि प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रितेश देशमुखने साताऱ्याचे जिल्हाधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधत मदतीची मागणी केली.

“ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आम्ही सौरभच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात आहोत. शोधकार्य अजूनही सुरू आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील चित्रीकरण स्थगित केलं (shooting)आहे.” जिथे ही घटना घडली त्या संगम माहुली नदीपात्रात याआधीही भोवऱ्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे स्थानिकांनी सतर्कतेचं आवाहन केलं आहे. सौरभचं मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरूच असून नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावरून सौरभसाठी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा :

बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…

अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’

हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक

केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ