धोनी मैदानात घुसला, कोहलीने अंपायरशी वाद घातला… मग दिग्वेश राठीवरचं बॅन का?

भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने बीसीसीआयवर टीका केली आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर अनुशासनात्मक कारवाईमध्ये एकरूपता नसल्याचा आरोप करत सेहवागने ही टीका केली आहे. सेहवागने लखनऊ सुपर जाएंट्सचा गोलंदाज दिग्वेश सिंह राठीवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सेहवागने एम एस धोनी(Dhoni) आणि विराट कोहली यांनी नियमांच्या केलेल्या उल्लंघनाचा हवाला देत दिग्गज क्रिकेटर्सना शिक्षा देताना झुकत माप देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दिग्वेश राठीवर सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा सोबत मैदानात घातलेल्या वादानंतर एका सामन्याचा बॅन लावण्यात आला. आयपीएल 2025 मधील दिग्वेश राठीने हैदराबाद विरुद्ध सामन्यात आचारसंहितेचं तिसरं उल्लंघन होतं. बीसीसीआयने हा निर्णय देताना म्हंटलं की, राठीचे निलंबन हे केवळ अभिषेक शर्माशी झालेल्या वादामुळे नाही, तर संपूर्ण हंगामात अनेक घटनांमधून मिळालेल्या डिमेरिट पॉइंट्समुळे झाले आहे.

माजी क्रिकेटर वीरेंद्र सहवागने दिग्वेश राठीवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई खूप कठोर असल्याचं म्हटलं आहे. सेहवागने क्रिकबजशी बोलताना म्हटले की, ‘मला वाटत त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय कठोर होती. तो मुलगा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळतोय. यापूर्वी धोनी(Dhoni) सुद्धा मैदानात घुसला होता, तेव्हा त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही. विराट कोहलीने सुद्धा अनेकदा मैदानात अंपायरशी वाद घातला होता त्याच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे राठीला तुम्ही माफ करू शकला असतात’.

लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणारा दिग्वेश सिंह राठीने यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमधील हे त्याचं प्रथम वर्ष असून फलंदाजांना बाद केल्यावर त्याने केलेलं नोटबुक सेलिब्रेशन खूप प्रसिद्ध ठरलं. आयपीएलच्या आचारसंहितांचं उल्लंघन केल्याने त्याच्यावर अनेकदा फाईन सुद्धा लावण्यात आला.

तसेच बीसीसीआयने डिमेरीट पॉईंट्स सुद्धा दिले. मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 4 एप्रिलला खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याला दोन डिमेरिट पॉईंट्स देण्यात आले होते. नोटबुक सेलिब्रेशनमुळे दिग्वेश राठीवर ५ डिमेरिट पॉईंट्स आहेत, ज्यामुळे त्याला एका सामन्यात निलंबनाची शिक्षा भोगावी लागली. दिग्वेश राठीने 12 सामन्यात एकूण 14 विकेट घेतल्या.

हेही वाचा :

आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल

हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार