शरद मोहोळ खूनप्रकरण;पोलिसांनी सादर केले दोन हजार पानांचे दोषारोपपत्र

सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.(police)त्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गेल्या पाच जानेवारी रोजी कोथरूड भागातील सुतारदरा भागात खून झाला होता. याप्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. गुरुवारी ता. २३ विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुन्हे शाखेने सोळा आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

मोहोळ खूनप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणात आत्तापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील (police)मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह अन्य आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोका कारवाई करण्यात आली

शरद मोहोळचा खून झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळजवळ मोटारीचा पाठलाग करून आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन,(police)पाच काडतुसे आणि दोन मोटारी ताब्यात घेतल्या होत्या. जमिनीच्या आणि आर्थिक वादातून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर; साखर उत्पादनात महाराष्ट्र नंबर वन, उत्तर प्रदेशालाही टाकले मागे

30 वर्षांपूर्वी मेलेल्या मुलीसाठी नवरा शोधतंय कुटुंब सत्य ऐकून थरथर कापाल

कोल्हापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग हटवलं; सांगली मनपाची कारवाई

शरद पवारांना मतदानानंतर 16 दिवसांनी विजयाची चाहुल लागली?