धक्कादायक ! शिक्षकाने विद्यार्थिनीला घरी बोलावलं; फोटोही मागितले अन् नंतर…

बोराळे येथील एका माध्यमिक प्रशालेतील शिक्षकाने (photos)17 वर्षीय विद्यार्थिनीस ‘तू माझ्या घरी ये, मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील व तुझा बोर्डात नंबर येईल’, असे म्हणून शारिरिक संबंधाची मागणी केली. नंतर घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून लगट केली. याप्रकरणी येथील माध्यमिक शिक्षक रमेश नागनाथ पाटील याच्याविरूध्द पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला.पीडित मुलगी ही 17 वर्षांची असून, ती पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असताना सदर आरोपी हा हिंदी व मराठी विषय शिकवायला येत होता.

तासाच्या वेळी आरोपी हा सदर अल्पवयीन मुलीच्या जवळ येऊन अंगाला हाताने स्पर्श करून बोलत असायचा. मात्र, यावेळी पीडिता ही लहान असल्यामुळे तिला काही समजत नसल्याने ती घरात कोणाला काही बोलली नाही. त्यानंतर सातवी व आठवी वर्गावर आरोपी शिक्षकाचा कोणताही तास नसताना अल्पवयीन मुलीस सातत्याने जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न करत असे. आरोपीने अल्पवयीन मुलीस ‘तू माइया घरी ये, आमच्या घरी कोण नसते. आपणास खुले बोलता येईल’, असे म्हणून व्हॉटसअ‍ॅपव्दारे वारंवार मेसेज केला.

तसेच फोटो पाठविण्यासही सांगितले. त्यावेळी मुलीने ‘आमचा ग्रुप फोटो आहे. माझा वैयक्तिक फोटो नाही, असे सांगितले. घरी आल्यास मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्तीचे मार्क पडतील. तुझा बोर्डात नंबर येईल व तुझे नाव होईल, असे म्हणून आरोपी शिक्षकाने मुलीकडे दोन वेळा शारिरिक संबंधाची मागणीही केली होती. 17 मार्च 2025 रोजी शेवटचा भूगोलचा पेपर दोन वाजता संपला. त्यावेळी आरोपी शिक्षकाने फोन करून पेपर कसा गेला? असे विचारून ‘आमच्या घरी तू कधी येते?’, असे विचारले.त्यावेळी मुलीने घरी येण्यास नकार देऊन फोन कट केला. त्यानंतरही आरोपीने वारंवार फोन करून ‘घरी ये नाही तर मी तुला दहावीच्या पेपरला नापास करेन. (photos)तसेच तुझ्या लहान बहिणी आमच्या शाळेत आहेत. मी त्यांना त्रास देईन’, असे फोनवरून बोलू लागले.

त्यावेळी पीडिता घाबरून आरोपी शिक्षकाच्या घरी सायंकाळी चारच्या सुमारास गेली. त्यावेळी घरी आरोपी शिक्षक एकटाच होता. आरोपीने त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद केला व जवळ ओढून अंगाशी लगट करू लागला. चुंबनही घेऊ लागला. तेव्हा पीडिता मोठमोठ्याने ओरडू लागल्याने आरोपीने तिला सोडून दिले.भीतीपोटी पीडितेने याची कुठंही वाच्यता केली नाही. आरोपीचा नंबरही ब्लॉक केला होता. (photos)16 एप्रिल रोजी पुन्हा आरोपीने मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली. घरातील लोकांनी व्हॅाटअ‍ॅपवर आलेले आरोपीचे मेसेज पाहिले व घडला प्रकार पीडितेने घरी सांगितला. पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.

हेही वाचा :

आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र? कोणाचा होणार पत्ता कट? जाणून घ्या

उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स ऐवजी ‘हे’ 5 हेल्दी ड्रिंक्स प्या, तुमचे शरीर होईल थंड

स्कूल बस चालकाकडून ४ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; प्रायव्हेट पार्टमध्ये घातला पेन

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का BCCIने दिली माहिती

‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?