मोठी बातमी! राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

आज राज्य मंत्रिमंडळाची(cabinet) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागात 4, विधी व न्याय विभागात एक, नगरविकास विभागात एक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागात एक आणि गृहनिर्माण विभागात एक असे एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आज राज्यातील ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची(cabinet) शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी हजेरी लावली.

1) कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी

2) बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार

3) उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी

4) राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम

5) सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार

6) अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी 2025.64 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार

7) पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 6394.13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता.

8) शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 4869.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बँकांना महत्त्वाचे निर्देश

लोकलच्या जनरल डब्ब्यात पुरुषाकडून महिलेला मारहाण; धक्कादायक Video ने खळबळ

कोण आहे Sai Dhanshika? जिच्यासोबत सुपरस्टार विशाल घेणार सात फेरे