वैष्णवी हगवणेप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. (shock)वैष्णवी हगवणेच्या तिच्या सासरच्यांनी खूप छळ केला. तिला मारहाण केली. त्यानंतर वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा पाहून संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने लग्नात नवऱ्यासाठी खास उखाणादेखील घेतला होता.

वैष्णवी लग्नानंतर पहिल्यांदाच उखाणा घेत होती.चंदेरी थाळी, सोनेरी मटण…शशांक रावांना आवडतं चिकन आणि मटन, असा उखाणा तिने घेतला. यानंतर तिने चिकनलव्हर असंही म्हटलं होतं. उखाणा घेताना तिच्या चेहऱ्यावरचं हसू सर्वकाही सांगत आहे. लग्नात ती किती खूश होती. परंतु याच लग्नाने तिचा जीव घेतला. (shock)तिला खूप त्रास दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वैष्णवी हगवणेचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडला होता. तिच्या वडिलांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. लग्नानंतर वैष्णवी उखाणा घेताना दिसत आहे.(shock) ती हा उखाणा घेताना खूप आनंदी दिसत आहे. परंतु ज्या नवऱ्यासाठी एवढ्या आनंदाने उखाणा घेत होती. त्याच नवऱ्याने तिचा छळ केला.
वैष्णवी हगवणेच्या लग्नात तिच्या वडिलांना ५१ तोळं सोनं, फॉर्च्युनर अन् चांदी दिली होती. त्यानंचरही तिच्या सासरच्यांची मागणी वाढत होती. तिच्या नवऱ्याने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपये मागितले होते. ते पैसे न दिल्याने तिचा खूप छळ झाला. तिला मारहाण झाली. वैष्णवीचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्यादिवशीही तिला मारहाण करण्यात आली होती. तिच्या अंगावण २९ व्रण होते. त्यातील ५-६ व्रण ताजे होते, अशी माहिती समोर आली.
हेही वाचा :
भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..
‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज
आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण