बाईक पुलावरून कोसळली पण तरुणाच्या स्टंटबाजीने वाचवला जीव; Video Viral

सोशल मीडियावर स्टंटबाजीचे(stunt ) अनेक व्हिडीओज शेअर केले जातात. लोक आपल्याला व्हायरल करण्यासाठी नवनवीन स्टंट करू पाहतात. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास असे बरेच व्हिडिओ तुम्ही आजवर इथे पाहिले असतील मात्र सध्या इथे एक नवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यात एका व्यक्तीने स्टंटबाजी करत स्वतःला मृत्यूच्या विळख्यातून सोडवल्याचे दिसून आले आहे.

हे दृश्य खरंतर कोणत्या चित्रपटाच्या सीनहुन कमी वाटत नाही. बॉलिवूड, हॉलिवूडलाही मागे टाकणाऱ्या या प्रत्यक्ष घटनेने आता सोशल मीडियावर चर्चेचा उधाण आले आहे(stunt ). यात नक्की काय आणि कसं घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

व्हिएतनाममधील एका रस्त्यावर जीवन आणि मृत्यूचा खरा खेळ दिसून आला. दुचाकीवरून तीन प्रवासी रस्त्याने जात असतानाच अचानक त्यांच्या बाईकचे नियंत्रण सुटते आणि ही बाईक पुलाच्या पुलाच्या रेलिंगला धडकत खाली पडते. मात्र यातही एक चमत्कार घडून आल्याचे व्हिडिओत दिसून येते. बाईक पुलाच्या खाली पडेल तितक्यात अवघ्या काही सेकंदातच बाईकवर शेवटी बसलेल्या तिसरा व्यक्ती उडी मारतो आणि रोलिंगला पकडत अगदी सहज तिथून बाहेर पडतो. व्यक्तीचे हे धाडस पाहून आता त्याने टॉम क्रूझला मागे टाकल्याची प्रतिक्रिया सोशल मीडिया युजर्सकडून मिळत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही ओहऊ शकता यात एका मुलाने जीवन आणि मृत्यूच्या मध्ये उभ्या असलेल्या बाईकवरून अशा प्रकारे उडी मारली की तो अक्षरशः मृत्यूच्या जाळ्यातून घरी परतल्याने दिसून आले. हे दृश्य एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी नव्हते. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तीन जण एका दुचाकीवरून वेगाने पुलाकडे जात आहेत.

अचानक समोरून एक व्हॅन येते आणि दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटते. आता पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता, पण दुचाकी पुलाच्या रेलिंगला धडकणार इतक्यात तिसरा व्यक्ती क्षणार्धात उडी मारतो. तो हवेत उडतो आणि लोखंडी रेलिंग पकडतो.

घटनेचा हा थरार आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4 मिलियनहून अधिकच्या लोकांनी पाहिले असून लाखो लोकांनी कमेंट्समध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण चालकाचे काय झाले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला खरंतर इतर दोघांची काळजी वाटतेय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :