पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षिय तरुणीला भररस्त्यात थांबून दोन तरुणांनी हत्या(murdered) केली. ही हत्या रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आलं आहे. तरुणीचं नाव कोमल जाधव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी कोमलवर वार करत तिची हत्या(murdered) केली. हत्या केल्यानंतर हे तरुण परिसरातून फरार झाले. मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. दोन्ही आरोपींना हेल्मेट घातलेलं असल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी अंगात काळे कपडे आणि हेल्मेट घातल्याचे दिसून येत आहे. हेल्मेटमुळे त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र चिंचवड पोलिसांचं डीबी स्कॉड, तपास पथक आणि गुंडा विरोधी पथकाने तातडीने आरोपींचा माग घेतला. आणि अवघ्या काही तासातच आरोपींना जेरबंद केलं.
आरोपी हे दिल्लीचे रहिवासी असल्याची पाथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी हे दिल्लीवरून हत्या करण्यासाठी आले होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींनी प्रेम प्रकरणातून कोमलची हत्या(murdered) केली असावी असा अंदाज वार्तिविला जात आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीवरून चामोर्शीकडे येत असताना कुरुड बस थांब्याजवळ घडली. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गडचिरोली आणि यवतमाळ मध्ये दोन भीषण दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
एक अपघात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झाला तर दुसरा अपघात ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर तुळजापूर मार्गावरील बलवंत मंगल कार्यालयासमोर येथे घडली. दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले.
हेही वाचा :
सतेज पाटील यांना मोठा धक्का, खंद्या समर्थकाने साथ सोडली, दुसरा पक्ष निवडला!
“हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
युद्धबंदीनंतर शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स २३०० अंकांनी वाढला