रात्री पार्टी, डेडबॉडी शेजारी…; भाजप नेत्याच्या मुलाच्या मृत्यूने खळबळ

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पश्चिम बंगालचे माजी अध्यक्ष दिलीप घोष (door)यांचे सावत्र पुत्र श्रींजय दासगुप्तायांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. श्रींजय दासगुप्ता यांच्या आईचे नाव रिंकू मजूमदार आहे, ज्यांचे काही दिवसांपूर्वी दिलीप घोष यांच्याशी लग्न झाले आहे.मंगळवारी श्रींजय दासगुप्ता हे न्यूटाऊन येथील सपोर्जी हाऊसिंगमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत होते. बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर त्यांना तातडीने बिधानानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बिधाननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रींजय दासगुप्ता सोमवारी रात्री उशिरापर्यंत सपोर्जी हाऊसिंगमधील आपल्या राहत्या घरी मित्रांसोबत पार्टी करत होते. या घरात रात्री उशिरापर्यंत ही पार्टी रंगली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रींजय नेहमीप्रमाणे सोमवारी कार्यालयात गेले होते आणि संध्याकाळी घरी परतले. रात्री उशिरा त्याचे काही मित्र घरी आले होते. मात्र, हे मित्र नेमके कोण होते, (door) याची माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकलेली नाही आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

श्रींजयच्या मृतदेहाजवळ काही औषधी गोळ्यादेखील सापडल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, श्रींजयचा मृत्यू नशेच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचा मृत्यू नेमका गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे झाला की त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस कसून करत आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे निश्चित कारण समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, श्रींजयच्या घरी आलेल्या मित्रांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (door) तसेच, घटनास्थळावरून मिळालेल्या औषधी गोळ्या कोणत्या प्रकारच्या होत्या आणि श्रींजयने त्या किती प्रमाणात घेतल्या होत्या, याची माहिती घेण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासातून सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय

‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल