तामिळनाडूमधील रानीपेट जिल्ह्यातील अरक्कोनम येथे DMK युवा शाखेच्या (politicians)पदाधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने लैंगिक अत्याचार, छळ आणि इतर तरुणींना राजकारण्यांसोबत जबरदस्ती झोपायला लावल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने स्पष्टपणे सांगितले की, “त्याचे कामच म्हणजे २० वर्षांच्या मुलींना राजकारण्यांसोबत झोपायला लावणे.”“कॉलेजला जाताना त्याने माझ्यावर हल्ला केला, मला जखमी केले आणि माझा फोन फोडला. पोलिसांकडे गेले तर मला तुकडे करीन अशी धमकी दिली. त्याच्या त्रासामुळे मी विष घेण्याचा प्रयत्न केला,” असे पीडितेने म्हटले. तिने मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्याकडे कारवाईची विनंती केली आहे.

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना AIADMKचे नेते एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, “DMK पदाधिकारी राजकारण्यांसाठी महिलांना उपलब्ध करून (politicians) देतो, हे अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास विलंब केला, कारण आरोपीच्या सत्ताधारी पक्षातील संबंधांमुळे दबाव होता.”पलानीस्वामींनी स्टालिन सरकारवर टीका करत म्हटलं की, “Pollachi प्रकरण मी प्रामाणिकपणे CBI कडे दिलं.

मात्र, तुम्ही अरक्कोनम प्रकरणात गुन्हा कमकुवत करण्याचं काम करता आहात.” त्यांनी हेही इशारा दिला की, जर आरोपीवर कारवाई झाली नाही तर AIADMK जनतेच्या पाठिंब्याने (politicians)आंदोलन छेडेल.द्रमुक पक्षाने म्हटलं आहे की, “तक्रारीनुसार पोलिस चौकशी सुरू आहे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. पक्ष स्तरावरदेखील योग्य निर्णय घेण्यात येईल.”
हेही वाचा :
असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral
रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा
सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल