आटपाडी घाणंद ता. आटपाडी येथील ओढ्यात वाहून गेलेल्या आठ वर्षीय अजय विकास माने या चिमुकल्याचा मृतदेह (stream) अखेर मंगळवारी शोध पथकाला आढळून आला. सलग दोन दिवस सुरू असलेल्या जीवघेण्या शोधमोहीमेनंतर अजयचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण घाणंद गाव शोकमग्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अजय हा मतिमंद मुलगा असून तो पलूस येथील मूकबधिर शाळेत शिक्षण घेत होता. शाळेला सुट्टी लागल्याने तो काही दिवसांसाठी गावी आला होता. येत्या १ जून रोजी तो पुन्हा शाळेत जाणार होता. (stream) मात्र नियतीने त्याच्या आयुष्याला क्रूर वळण दिले. रविवारी दुपारी चारच्या सुमारास अजय गावाजवळील ओढ्याकाठी गेला असताना टेंभू योजनेचे पाणी सोडल्यामुळे ओढ्याला मोठा पूर आला होता. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात वाहून गेला.
हेही वाचा
मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी ‘या’ तारखेला होणार एन्ट्री