मध्य प्रदेशमधील हायवेवरील अश्लील व्हिडिओमुळे समाजमाध्यमात संतापाची लाट (highway)असतानाच भाजप नेत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप यांचा हा व्हिडिओ आहे. कश्यप हे एका महिला कार्यकर्त्यासोबत मिठी मारतानाचा हा अश्लील व्हिडिओ असल्याचे सोशल मीडियात बोलले जातेय.. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश भाजपमध्ये नाराजी दिसून आली. भाजप नेते कश्यप हे महिला कार्यकर्त्यासोबत अश्लील वर्तन करताना व्हिडिओत दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच पक्षाने कश्यप यांच्याविरोधात कारवाई केली आहे. भाजप नेत्याकडून आणि त्या महिलेकडून या व्हिडिओवर स्पष्टीकरण आले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, व्हायरल होणारा व्हिडिओ यूपीतील गोंडा जिल्ह्यातील भाजप कार्यालयातील आहे. या व्हिडिओत अमर किशोर कश्यप एका महिला कार्यकर्त्यासोबत अश्लील वर्तन करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले आणि त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली.व्हायरल व्हिडिओमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर कश्यप दिसत आहेत. (highway)तसेच एक महिलाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये आधी महिला पायऱ्या चढून येते. नंतर त्यांच्या पाठोपाठ अमर किशोर कश्यप देखील येतात. दोघेही थोडं पुढे चालत जातात आणि किशोर हे महिलेला कवेत घेतात. हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नंतर ते दोघेही वरील पायऱ्यांवर चढून जातात.
व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी जिल्हाध्यक्षांवर टीकेची तोफ डागली. त्यानंतर भाजपचे सरचिटणीस गोविंद नारायण शुक्ला यांनी कश्यप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की,(highway) “सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या या व्हिडिओमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे आणि हे वर्तन पक्षाच्या शिस्तीच्या विरुद्ध आहे.”व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कश्यप यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांचा डाव असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, “व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ही पक्षाची कार्यकर्ती आहे.
रात के 9.39 बजे हैं। Video उत्तर प्रदेश में गोंडा जिले के BJP दफ्तर की है। जिलाध्यक्ष अमर किशोर एक महिला को लेकर आते हैं। आलिंगन जिलाध्यक्ष जी CPR देते भी दिखते हैं, फिर एक फ्लोर ऊपर चले जाते हैं। वहां की फुटेज अभी प्राप्त नहीं हुई है।
— Sachin Gupta May 25, 2025
जिलाध्यक्ष का बयान– "महिला कार्यकर्ता की… pic.twitter.com/vqRMTV14v3
त्या दिवशी तिची तब्येत बिघडली होती आणि तिने विश्रांतीसाठी जागा मागितली होती. मी तिला कार्यालयात घेऊन गेलो. पायऱ्या चढत असताना तिला चक्कर आली, म्हणून मी तिला आधार दिला. हा व्हिडिओ माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे.” असा त्यांनी आरोप केला.लखनौमधून माघारी परतली होती. गोंडा येथे आल्यावर माझी प्रकृती अचानक बिघडली. जिलाध्यक्ष कश्यप यांनी आराम करण्यासाठी भाजप कार्यालयात सोडलं. पण अचानक मला चक्कर आली, त्यावेळी त्यांनी मला पडण्यापासून वाचवलं. ते माझ्या वडिलांसारखे आहेत, असे स्पष्टीकरण त्या महिलेनं दिले आहे.
हेही वाचा :
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेता भाजपच्या वाट्यावर
‘त्याने माझ्याकडे पाहून पँटची चैन उघडली अन्…’; अभिनेत्रीसोबत मुंबईच्या रस्त्यावर घडला विचित्र प्रकार
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission