कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार हे आस्तिक (intelligent)आहेत की नास्तिक आहेत या प्रश्नाचं महाराष्ट्रातील तमाम सुज्ञ जनतेला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. राजकारणासारखंच त्यांचं अध्यात्म देखील अनाकलनीय आहे. वारकरी संप्रदाय हा धर्मांध बनला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी एका लेखांमध्ये केला आहे. आणि आता त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. वारकरी संप्रदाय धर्मप्रसाराचे काम इमाने इतबारे करत आला आहे,मग तो धर्मांध कसा? याचे काही पुरावे त्यांनी दिले पाहिजेत. वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचाराशी जोडलेला आहे. तो संत परंपरा मानतो.

आणि सर्व संत परमेश्वर चरणी (intelligent)लीन झालेले दिसतात. संतांच्या माध्यमातून परमेश्वराशी संवाद साधणारा वारकरी संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाची सुरुवात विठ्ठल भक्त संत नामदेव यांनी सुरू केली. चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची सुरुवात संत नामदेवांच्या पायरी पासून होते. आणि म्हणूनच वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर हे एकमेकांपासून विलग होऊ शकत नाहीत. पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय ही गेल्या अनेक शतकांची परंपरा आहे.
धर्माचरण करा हा संदेश देणारा (intelligent)वारकरी संप्रदाय हा धर्मांध कसा असू शकतो? या संप्रदायातील प्रवचनकार, कीर्तनकार हे पूर्व रंगात दृष्टांत सांगतात आणि उत्तर रंगात परमेश्वरी साक्षात्कार सांगतात. हिंदू धर्मीय हे परमेश्वराचे अस्तित्व मान्य करतात. म्हणून मग त्यांना प्रतिगामी म्हणायचे काय? आपल्याकडे पुरोगामी कोण आणि प्रतिगामी कोण? याची सुस्पष्ट व्याख्या कोणी सांगितलेली नाही. जे परमेश्वरला म्हणतात ते आस्तिक, आणि जे परमेश्वराला मानत नाहीत ते नास्तिक अशी सर्वसाधारण व्याख्या केली जाते. मी कोल्हापूरला जातो, पंढरपूरला जातो, तिथे गेल्यानंतर मी मंदिरात जातो पण मी त्याचे अवडंबर करत नाही.
त्याचे फोटो छापून आणत नाही. (intelligent)मी कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ बारामती मधील मारुतीच्या मंदिरात श्रीफळ वाढवून करत असतो असे खुलासे शरद पवार हे अधून मधून करत असतात. पण त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना शरद पवार हे नास्तिक आहेत असे जाहीरपणे सांगितले होते. कुठल्यातरी एका स्मरणीकेत शरद पवार यांनी एक लेख लिहिला आहे आणि त्या लेखांमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. या संप्रदायात 60% पेक्षा अधिक प्रतिगामी लोकघुसले आहेत. आणि ते धर्मांध आहेत.
म्हणूनच वारकरी संप्रदायावर (intelligent)धर्मांध लोकांचा प्रभाव आहे असे त्यांनी या लेखात म्हटले आहे. वारकरी संप्रदायातील या घुसखोरांच्याकडून धर्मांधतेचा प्रसार केला जातो आणि हे लोक कोण आहेत याची आता आम्ही एक यादीच करत आहोत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. प्रतिगामी कोण आहेत आणि त्यांची नेमकी व्याख्या काय आहे याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी द्यायला हवे. या देशातील तथाकथित पुरोगामी यांच्याकडून, जे मंदिरात जातात, पूजा अभिषेक वगैरे करतात, नवससायासं बोलतात, गर्व से कहो हम हिंदू है असा नारा लावतात, ते सर्व प्रतिगामी अशी सरळधोपटव्याख्या सध्या केली जात.
मुळातच शरद पवार यांनी त्यांची (intelligent) एकूण अध्यात्मिक भूमिका पाहता वारकरी संप्रदायावर बोलणे उचित वाटत नाही. वारकरी संप्रदायामध्ये उच्च आणि नीच असा भेदभाव पाळला जात नाही. जात भेद अंगीकारला जात नाही. जो फक्त संतांचे विचार मानतो, “उत्तम व्यवहारे धन जोडोनिया, ते उदासे वेच करी”असे सांगणारे संत तुकाराम, “जो जे वांछील तो ते लाहो”असे आपल्या पसायदानातून सांगणारे संत ज्ञानेश्वर यांनी फक्त मानवधर्म सांगितला आहे. आणि तोच धर्म वारकरी संप्रदायाकडून सांगितला जातो आणि त्याचा प्रसार केला जातो.
इथे धर्मांध विचार आले कुठून? (intelligent)वारकरी संप्रदायात जर धर्मांध घुसलेले असतील तर त्यांच्याकडून आत्तापर्यंत धर्म कलह केला गेला आहे, धार्मिक तेढ निर्माण केली आहे, वारकऱ्यांच्या कडून कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे असे कधीही घडलेलै नाही.आत्तापर्यंत झालेल्या “कम्युनल रॉयट्स”मध्येवारकरी मंडळी सापडली आहेत असे एकही उदाहरण ऐकिवात नाही. आणि म्हणूनच शरद पवार यांनी केलेला दावा हे एक प्रकारचे लिखित राजकीय प्रवचन आहे असे म्हणावे लागेल.