आपल्या देशात, राज्यात अशी अनेक गावं आहे, जिथली संस्कृति, परंपरा या देशातील तर भागांपेक्षा खूप वेगळ्या आहेत.(snakes )त्यापैकीच महाराष्ट्रातलं एक गाव चर्चेत आहे, ते म्हणजे शेटफळ हे गाव . ते एका रहस्याप्रमाणेच आहे. कारण इथल्या गावातील घरात लोकं कुत्रा, मांजर पाळत नाहीत, तर ते चक्क खतरनाक साप पाळतात साप..हो तुम्ही अगदी बरोब्बर वाचलं आहे.शेटफळ हे गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असन तिथले लोकं खतरनाक अशा कोब्रा सापांसोबत बिनधास्त जगतात, वावरताही. तिथल्या जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला साप दिसतील. आणि हे साप फक्त घरांतच नव्हे तर शेतात, झाडांवर आणि बेडरूमच्या आतही आढळतील. गावातले लोक या सापांना बिलकूल घापरत नाहीत, उलट त्याच सापांसोबत एकाच छताखाली राहतात, शांतपणे जगतात, त्यांच्याशी खेळतात आणि त्यांना दूधही पाजतात. शेटफळमध्ये कोब्रा सापांसाठी एक खास ठिकाण आहे.
शेटफळ गावातील लोक हे कोब्राला, सापांना भगवान शिवाचे प्रतीक मानतात, म्हणून ते सापांची पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या कुटुंबातील एक सद्सय मानतात. गावात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे सापांची पूजा केली जाते. गावातील लोकांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या पूर्वजांनी साप पाळण्यास सुरुवात केली.(snakes ) तेव्हापासून ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. साप कसे पकडायचे आणि ते कसे पाळायचे हे गावकऱ्यांना चांगलंच माहित आहे. एवढंच नव्हे तर सापांना कसं हाताळायचे हे इथले लोकं अगदी लहानपणीच शिकतात.आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतक्या सापांमध्ये राहूनही गावातील लोकांना साप चावण्याची, त्यांच्या दंशाची भीती वाटत नाही. ते म्हणतात की साप त्यांना कधीही चावत नाहीत. साप हे माणसांसारखेच प्राणी आहेत आणि त्यांनाही प्रेम तसेच आदरही हवा असतो, असा त्यांचा विश्वास आहे. .
शेटफळ गाव आता पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे गाव पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात. (snakes )गावकरी पर्यटकांना सापांबद्दल सांगतात आणि सापांना कसे हाताळायचे हे देखील शिकवतात.मात्र असं असलं तरी शेटफळ गावात साप पाळणे सोपे नाही. गावकऱ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. साप पाळण्यासाठी विशेष प्रकारचे अन्न आवश्यक असते. याशिवाय सापांना आजारांपासून वाचवणे हे देखील एक मोठे आव्हान आहे. या गावाचे संवर्धन करण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. सरकारने हे गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. यासोबतच, सरकार गावकऱ्यांना सापांच्या संवर्धनासाठी प्रशिक्षणही देत आहे.शेटफळ गाव हे भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे गाव आपल्याला निसर्गाशी एकरूप होऊन कसे जगता येईल हे शिकवते. आपण सर्व सजीव प्राण्यांबद्दल आदर आणि प्रेम बाळगला पाहिजे,हेदेखील हे गाव आपल्याला शिकवतं.
हेही वाचा :