सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केल्यानंतर आता सरकारनं (government loans)आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना 40 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज देण्याची घोषणा केली होती.
हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर (government loans)संजय राऊतांची तिखट प्रतिकिया
मात्र लाडकींसाठी कर्जाची अशी कोणतीही योजना नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय…
लाडकीसाठी काय होती कर्ज योजना?
जिल्हा बँकेकडून लाडकीला कर्ज देण्याची अजित पवारांची होती घोषणा
व्यवसायासाठी एकरकमी(government loans) 40 हजार दिले जाणार होते
कर्जाचे हप्ते 1500 रुपयांमधून कापून घेणार होते
लाडकीला स्वावलंबी बनवण्यासाठी होती कर्जाची योजना
आदिती तटकरेंच्या माहितीमुळे लाडक्या बहिणींसाठी कर्जाची कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महायुती सरकारने 2025-26 साठी 36 हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र लाडकीमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लावली जात असल्याचा आरोप थेट सत्ताधारी मंत्र्यांनीच केला होता. अशात तिजोरी रिकामी असतानाही अर्थमंत्र्यांनी लाडकीसाठी केलेल्या कर्जाची घोषणा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीच फोल ठरवलीय. आता लाडकीचे लाड सरकारलाही परवडत नाहीय, हेच यातून स्पष्ट होतंय.
हेही वाचा :
- लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ
- ‘हिताचा विचार…’ ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याआधी CM फडणवीसांचा आमदारांना महत्त्वाचा सल्ला
- जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाचा दणका, 200 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी मोठा निर्णय