विद्येच्या मंदिरात महिला शिक्षिकांचे जोरदार भांडण; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक शिक्षिकांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांना प्रश्न पडला आहे की, मुलांना शाळेत शिकायला पाठवायचे का नाही? शाळा म्हणजे एक ज्ञानाचे मंदिर असते. आई-वडिलांनतर एक शिक्षकच(teachers) मुलांच्या भविष्याला कलाटणी देण्याचे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करतो.

परंतु शिक्षिकाच(teachers) भांडायला लागल्या तर मुलांच्या भविष्याचे काय? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन शिक्षिकांची जोरदार भांडणे सुरु आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या प्राध्यपक आणि महिला ग्रंथपालमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु आहे. विद्यार्थ्यांसोमरचा हा सर्व प्रकार सुरु आहे. दोन्ही शिक्षिका एकमेकींच्या झिंझ्या उपटाताना दिसत आहेत. दोन्ही शिक्षकांमध्ये सुरुवातील शाब्दिक वाद सुरु असतो.

हा वाद इतका पेटतो की, दोघेही एकमेकींना लाथा-बुक्या मारायला सुरुवात करतात. यावेळी शिक्षिकांच्या आसपास काही विद्यार्थीनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्या थांबत नाही. एक विद्यार्थींनी आणखी एका शिक्षिकेला जाऊन बोलावून येते.

तिसऱ्या शिक्षिका दोघींची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मध्ये प्रदेशातील खरगोनच्या एकलव्य शाळेतील आहे. या घटनेनेतंर दोन्ही शिक्षिकांना कामावरुन निलंबित करण्यात आले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @nitendrasharma2 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कारावईची मागणी केली आहे, तर दुसऱ्या एकाने आमच्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न केला आहे. तिसऱ्या एका युजरने शाळा आहे की, कुस्तीचा आखाडा असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा :

इंडियन आयडल विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात

महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पगार दीड लाखांच्या पुढे मिळणार

अजित पवारांना शरद पवार राजकीयदृष्ट्या कधीच…. संजय राऊतांचं खळबळजनक राजकीय विधान