वारंवार जांभई येणे सामान्य गोष्ट नाही, असू शकतात ‘या’ आजारांची लक्षणे

रोजच्या धावपळीच्या कामात आपण खूप थकतो(yawning) त्यामुळे अनेकदा आपण दिवसभरात थकल्यावर व झोप आल्यावर जांभई देतो. त्यात थकल्यामुळे जांभई येणे खुप सामान्य आहे. अशातच तुम्हाला दिवसभर वारंवार जांभई येत असेल. त्यात अनेकजण हा थकवा दुर करण्यासाठी दुपारपर्यंत अनेक कप कॉफी पित असाल आणि तुम्ही हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवला तर हा सामान्य थकवा नसून गंभीर आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे काही वैज्ञानिक अहवालानूसार, वारंवार जांभई येणे हे झोपेच्या कमतरतेचे आणि झोपेच्या विकाराचे लक्षण असू शकते.

दिवसा जास्त झोप येणे ही केवळ आळस येत असेल तर त्यामुळे ड्रायव्हिंग अपघात, कामाच्या चुका, मानसिक समस्या आणि दीर्घकालीन आजार देखील होऊ शकतात. ही स्थिती बहुतेकदा अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांना पुरेशी आणि चांगली झोप मिळत नाही. त्यामुळे झोपेचा अभाव ही एक गंभीर (yawning) आरोग्य समस्या बनली आहे, ज्यामुळे समाजात दररोज अपघात आणि आरोग्य समस्या वाढत आहेत.

वारंवार जांभई येण्याचे कारण
झोपेचा अभाव
झोपेचे विकार जसे की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया किंवा नार्कोलेप्सी
ताण आणि नैराश्य
औषधांचे दुष्परिणाम
अनियमित जीवनशैली आणि रात्री उशिरा स्क्रीन टाइम
आरोग्यास कोणते धोके निर्माणी होऊ शकतात?
मानसिक थकवा आणि लक्ष (yawning) केंद्रित करण्यात समस्या
गाडी चालवताना अपघातांचा धोका वाढतो
कामाच्या ठिकाणी चुका होणे
नैराश्य आणि आत्महत्येचे विचार
सामाजिक वर्तनात बदल, जसे की चिडचिडेपणा आणि चिंता
ही समस्या कशी टाळायची?
दररोज किमान ७-८ तास झोप घ्या.
नियमित झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठेवा.
झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा.
कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा.
गरज पडल्यास झोप तज्ञाचा सल्ला घ्या.
डॉक्टरांच्या मते, वारंवार जांभई येणे हे केवळ थकव्याचे लक्षण नाही तर शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचा हा इशारा आहे. याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा आजार होऊ शकतो. म्हणून आजारांपासून दूर राहण्यासाठी झोपेला प्राधान्य द्या आणि निरोगी जीवनासाठी जागरूक रहा.

हेही वाचा :

बँकेत नोकरीची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु…

अनुराग कश्यपची मुलगीही त्याच ठिकाणी हनिमूनला, ‘दोन दिवस…’

हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांना थरकाप…; पहलगाम दहशदवादी हल्ल्यावरुन राज ठाकरे आक्रमक

केएल राहुलकडून अपमानाची अचूक परतफेड; संजीव गोयंका यांचा हिशोब बरोबर! पाहा व्हीडिओ

IPL 2025 मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजस्थान रॉयल्सला BCCI चा फुल सपोर्ट