व्होडाफोन आयडिया भारतातून गाशा गुंडाळणार? ‘हे’ आहे धक्कादायक कारण!

भारतातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी व्होडाफोन (doors)आयडियासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत स्पष्टपणे म्हटले आहे की, जर तिला बँकांकडून निधी मिळाला नाही, तर येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये आपले कामकाज सुरू ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता व्होडाफोन आयडिया भारतातून गाशा गुंडाळणार का? असा प्रश्न गुंतवणूकदारांसह ग्राहकांमध्ये उपस्थित झाला आहे.व्होडाफोन आयडियाच्या याचिकेनुसार, मार्च 2026 पर्यंत टेलिकॉम विभागाला तब्बल 18,000 कोटी रुपयांचा AGR हप्ता भरायचा आहे. मात्र कंपनीकडे सध्या इतका निधी उपलब्ध नाही. कंपनीने बँकांकडे कर्जासाठी पुन्हा प्रयत्न केला असता, AGR थकबाकी लक्षात घेता बँकांनी नकार दिला. त्यामुळे आर्थिक मदतीशिवाय कंपनीचे भवितव्य अंधारात आहे.

व्होडाफोन आयडियाने सर्वोच्च न्यायालयात 83,400 कोटी रुपयांच्या प्रलंबित AGR थकबाकीवरील व्याज, दंड व दंडावरील व्याज माफ करण्याची विनंती केली आहे. या सर्व एकत्रित रकमेची थकबाकी 45,000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. सरकारने यापूर्वी कंपनीला चार वर्षांचा मोरॅटोरियम दिला होता, (doors)जो सप्टेंबर 2025 मध्ये संपणार आहे.सरकारने यापूर्वी काही देणी इक्विटीमध्ये बदलून घेतल्याने सरकारचा व्होडाफोन आयडियामधील हिस्सा 49 टक्क्यांवर पोहोचला आहे. तरीही कंपनीवर एकूण स्पेक्ट्रम आणि AGR देणी मिळून सुमारे 2 लाख कोटी रुपयांहून अधिक देणे आहे. ही प्रचंड आर्थिक ओझ्याची परिस्थिती पाहता कंपनीसाठी कामकाज सुरू ठेवणे मोठे आव्हान बनले आहे.

कंपनीसाठी एक दिलासा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने AGR प्रकरणात पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीस सहमती दिली आहे. त्यामुळे काहीसा कायदेशीर आधार कंपनीला मिळू शकतो. या बातमीनंतर शुक्रवारी व्होडाफोन आयडियाचे शेअर्स 3.46% वाढून 7.48 रुपयांवर ट्रेड झाले. (doors)परंतु दीर्घकालीन दृष्टिकोनातून कंपनीचे अस्तित्व कायम राहील की नाही, हे अजूनही अनिश्चित आहे.रिलायन्स जिओच्या आगमनानंतर स्पर्धा तीव्र झाल्याने व्होडाफोन आयडियाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात घटला. ग्राहकसंख्या आणि महसूल दोन्ही कमी होत गेले. या पार्श्वभूमीवर कंपनीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि संभाव्य बँक फंडिंग महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

‘अटकेआधी एकनाथ शिंदेंनी मला फोन केला होता’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

गर्लफ्रेंडने व्हाट्सअ‍ॅपवर केलंय Blocked? टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही स्वत:च करू शकता Unblock

‘जे मोठ्या कलाकारांना जमले नाही, ते नॅन्सीने पुन्हा एकदा करून दाखवले,’ उंचावले देशाचे नाव!