आठवड्याच्या सुरुवातीला कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? कोणते स्टॉक्स गुंतवणूकदारांचं नशीब बदलणार?

जागतिक बाजारातील(stock market) उत्साहवर्धक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज ९ जून रोजी सोमवारी तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ८१७.५५ अंकांनी म्हणजेच १.४७% ने वाढून ५६,५७८.४० वर बंद झाला, तर आठवड्याचा शेवट १.४९% वाढीसह झाला.

शुक्रवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर ५० बेसिस पॉइंट्स (bps) ने ५.५०% पर्यंत कमी केल्यानंतर आणि कॅश रिझर्व्ह बँक (CRR) १०० bps ने ३% पर्यंत कमी केल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजाराने उच्चांक गाठला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या पातळीच्या वर बंद झाला. जोपर्यंत सेन्सेक्स ८१,६०० या पातळीच्या वर राहील, तोपर्यंत शेअर बाजारात तेजी राहण्याची अपेक्षा ठेवली जाऊ शकते. मात्र याउलट, जर सेन्सेक्स ८१,६०० च्या खाली गेला तर घसरण वाढू शकते, ज्यामुळे सेन्सेक्स ८०,२०० पर्यंत खाली येऊ शकतो.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार एचडीएफसी बँक, सुझलॉन एनर्जी, अंबुजा सिमेंट्स, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या स्टॉकवर आज लक्ष केंद्रित करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना गो डिजिट जनरल इन्शुरन्स, गोदरेज प्रॉपर्टीज , आदित्य बिर्ला रिअल इस्टेट, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी हे पाच शेअर्स खरेदी करण्यासाठी शिफारस केली आहे.

१०० पेक्षा कमी किमतीत गुंवकणूकदार(stock market) सहा इंट्राडे स्टॉक खरेदी करू शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. या इंट्राडे स्टॉक्समध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक , एचएफसीएल, कॉन्फिडन्स पेट्रोलियम, धनी सर्व्हिसेस , जीएमआर एअरपोर्ट आणि एनएचपीसी यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांचा असा विश्वास आहे की शुक्रवारी झालेल्या तीव्र तेजीनंतर येत्या काही दिवसांत निफ्टी ५० आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वैशाली पारेख यांनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स, वेदांत आणि बंधन बँक हे तीन स्टॉक खरेदी करण्याची शिफारस गुंतवणूकदारांना केली आहे.

अमेरिका आणि चीन व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याने सोमवारी आशियाई शेअर बाजारांनी तेजी दर्शविली. सुरुवातीच्या व्यापारात कोस्पी आणि हँग सेंग १.५ टक्क्यांनी वधारले, तर निक्केई १ टक्क्यांनी वधारले. सोमवारी सर्व प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर स्थिर राहिला.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. नवराष्ट्र कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

हेही वाचा :