लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट!

राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक मदत मिळवून देणारी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (provides )मे महिन्याचा हप्ता अद्यापही न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट करून दिलं आहे की, योजना बंद झालेली नाही आणि लवकरच हप्ता खात्यात जमा केला जाईल.आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “लाडकी बहीण योजना चालू आहे. मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल.” त्यांनी यासोबतच हप्त्याच्या विलंबाबाबत निर्माण झालेल्या गैरसमजांवरही स्पष्ट भूमिका मांडली.

चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत समोर आले की, काही सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना योजना बंद करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य पात्र महिलांसाठी ही योजना सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरही आदिती तटकरे यांनी भाष्य केले.(provides ) ऊस तोड कामगार महिलांशी संबंधित रिपोर्टबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असून, त्याची कारणमीमांसा केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली असून, यामध्ये आलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही बदल सुचवले गेले, तर तेही अंमलात आणले जातील, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. महिला आयोगावर कोणतीही वैयक्तिक टीका महायुतीतील नेत्यांकडून झालेली नाही,(provides ) असंही त्या म्हणाल्या.यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी देखील आपली भूमिका मांडली. “अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केंद्राच्या धर्तीवर करण्यात आली आहे आणि आमच्या खात्याचा निधी कमी झालेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. उलट निधी वाढवून मिळाल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :