सोमवारी मुंबईत झालेल्या व्होग ब्युटी अँड वेलनेस ऑनर्स कार्यक्रमात फॅशन आणि स्टाइलचा कार्यक्रम पार पडलाय.(serious ) शिल्पा शेट्टी, सारा अली खानपासून ते अदिती राव हैदरीपर्यंत, अनेक अभिनेत्री त्यांच्या फॅशन ए-गेमचे प्रदर्शन करताना दिसल्या. पण एक अभिनेत्री होती जिच्या एन्ट्रीने सर्वांना आश्चर्यचकित केले. ती अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू. जिने व्होग ब्युटी अँड वेलनेस ऑनर्समध्ये तपकिरी रंगाचा कट-आउट ड्रेस परिधान करून सर्वांना थक्क केलं. इंटरनेटवर प्रत्येकजण फक्त एकच प्रश्न विचारत होते ते म्हणजे ‘समंथाला नक्की काय झालं आहे?’ ती तपकिरी रंगाच्या स्लीक आणि फिटिंग ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती, पण तिचे वजन कमी झालेले पाहून अनेकांना तिची काळजी वाटू लागली.
सामंथाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री स्ट्रॅपी आणि डीप टोन ड्रेस परिधान केलेली दिसली. या ड्रेसमध्ये कंबरेजवळ सुंदर कट-आउट होते, जे तिच्या स्लिम बॉडीला आधुनिक शैलीत हायलाइट करत होते. तिने मॅचिंग हाय हिल्स, हलका पण उठावदार मेकअप, स्टाईल केलेले मोकळे केस असा तिचा लूक पूर्ण होत होता. पण समांथाच्या सौंदर्यासोबतच तिचे अचानक वजन कमी झाल्याचीही बरीच चर्चा होत आहे. समंथाचे अचानक वजन कमी झालेले पाहून सर्वजण थक्क झाले आणि एका युजरने लिहिले की, ‘अरे देवा, तिचे वजन खूप कमी झाले आहे.(serious )’ एका युजरने कमेंट केली, “आज समांथा सामंथासारखी दिसत नाहीये. पहिल्या नजरेत ओळखता येत नाहीये… तिने खूपच वजन कमी केले आहे.”
खरं तर, 2024 मध्ये, सामंथाने स्वत:च खुलासा केला होत की तिला मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रासले आहे. तिने सांगितले होते की ती फारच स्ट्रिकली डाएट फॉलो करते. जेव्हा लोकांनी तिच्या वजन कमी करण्याबद्दल कमेंट केली तेव्हा तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचं उत्तरही दिलं आहे, “ओह, आणखी एक वजन कमेंट… मी यावर एक संपूर्ण थ्रेड पाहिला. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वजन कमी करण्याचं मुख्य कारण म्हणजे मी माझ्या आजारासाठी आवश्यक असलेला कडक अँटी-इंफ्लेमेटरी डाएट घेत आहे. हा डाएट मला वजन वाढण्यापासून रोखतो आणि मला एका विशिष्ट वजनाच्या मर्यादेत ठेवतो जो माझ्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. कृपया लोकांनी जज करणे थांबवा आणि त्यांना ते जसे आहेत तसे राहू द्या. आयुष्य जगू द्या” असं म्हणत तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या वजन कमी करण्याबद्दल सांगितलं होत.
हार्वर्ड हेल्थच्या मते, आहाराद्वारे शरीराला येणाऱ्या सुजेला नियंत्रित करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळणे. यामध्ये अशा सर्व अन्नपदार्थांचा समावेश आहे जे त्यांच्या नैसर्गिक स्वरूपातून लक्षणीयरीत्या बदलले आहेत आणि सहसा पॅकेजमध्ये उपलब्ध असतात. (serious )जसे की रेडीमेड जेवण, आधीच शिजवलेले मांस (जसे की सॉसेज, चिकन नगेट्स), रेडीमेड सूप मिक्स, पॅकेज केलेले मिठाई, बिस्किट, प्रक्रिया केलेले डेली मीट, तयार सॉसेज. यामध्ये सहसा प्रिझर्व्हेटिव्ह्ज, रिफाइंड साखर, अस्वास्थ्यकर चरबी आणि कृत्रिम घटक असतात, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढू शकते.
याशिवाय, पांढरी ब्रेड, पारंपारिक पॅकेज केलेले धान्य, रिफाइंड पीठ पास्ता आणि पॉलिश केलेले पांढरे तांदूळ यांसारखे रिफाइंड धान्य उत्पादने देखील जळजळ वाढवू शकतात कारण त्यात फायबर आणि पोषक तत्वांचा अभाव असतो आणि शरीरात रक्तातील साखर वेगाने वाढते.याशिवाय, काही इतर पदार्थ आहेत जे शरीरात सूज वाढवू शकतात, जसे की साखरेचे पेये सोडा, पॅक केलेले फळांचे रस, बाजारात मिळणारे कुकीज आणि पेस्ट्री, बटर, चीज, फुल-फॅट आईस्क्रीम इ. बाजारात उपलब्ध असलेले पास्ता सॉस आणि बेकन, पेपरोनी, हॅम आणि सलामी यांसारखे प्रक्रिया केलेले मांस देखील शरीरातील चरबी ब्लड शुगर वाढवू शकतात.
हेही वाचा :
आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!
UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल
हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार