कोविड रुग्णांची संख्या 2700 च्या पुढे, 7 मृत्यूंची नोंद; केरळ, महाराष्ट्र अन् दिल्लीला हायअलर्ट

देशात सक्रिय कोरोना(Covid ) विषाणू रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 2710 सक्रिय कोविड रूग्ण नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच चिंता वाढली आहे.

आकडेवारीनुसार केरळमध्ये 1,147 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्र (424), दिल्ली (294) आणि गुजरात (223) यांचा क्रमांक लागतो. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 148 प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये 116 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

गेल्या 24 तासांत सात मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतील मृतांची संख्या 22 झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. बहुतेक कोविड प्रकरणे सौम्य असल्याचे नोंदवले गेले आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मिझोरममध्येही दोन कोविड(Covid ) रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) LF.7 किंवा NB.1.8 ला चिंताजनक प्रकार म्हणून वर्गीकृत केलेले नाही. तज्ञांनी म्हटलंय की, नवीन प्रकारांमध्ये काही प्रमाणात प्रतिकारशक्ती टाळण्याची क्षमता असू शकते, परंतु ते गंभीर दीर्घकालीन संसर्गास कारणीभूत ठरू शकतात, असे सूचित करणारे कोणतेही पुरावे नाहीत.

ही लक्षणे सामान्य फ्लूशी मोठ्या प्रमाणात जुळतात. काही लक्षणांमध्ये ताप, नाक वाहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा यांचा समावेश आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असताना, अनेक राज्यांनी रुग्णालयांना बेड, ऑक्सिजन सिलिंडर, चाचणी किट आणि लसींची उपलब्धता राखण्याचे निर्देश दिले आहेत. वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांना गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा :