‘लहान मुलं देवाघरची फुलं’ अशी उपमा लहान मुलांना दिली जाते मात्र ही लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नाही. लहान मुलं ही फार कोवळी असतात ती कधी काय करतील ते सांगता येत नाही ज्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. पालकांनी मुलांची खबरदारी घेतली नाही अनर्थ होऊ शकतो. खेळता खेळता मुलं किती भीषण पाऊल उचलू शकतात याचे एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात एक चिमुकला चक्क खेळणं समजून एका किंग कोब्राशी(cobra) खेळताना दिसून आला. किंग कोब्रासारख्या विषारी आणि धोकादायक प्राण्यासोबत त्याला असे खेळताना पाहून सर्वच अचंबित झाले. यात पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
लहान मुलांना खेळण्यांची खूप आवड असते. ते जमिनीवर पडलेली कोणतीही वस्तू उचलतात आणि त्याच्याशी खेळू लागतात मात्र आता जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यात तर एक मुलगा चक्क विषारी किंग कोब्रासोबत खेळताना दिसून आला. मुळातच किंग कोब्रा(cobra) हा जंगलातील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी मानला जातो. त्याचे ताकद पाहता कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करत नाही मात्र चिमूल्याच्या या पराक्रमाने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही मुलाला किंग कोब्रा(cobra) सापासोबत खेळताना पाहू शकता. कधी तो सापाच्या फणाशी छेडछाड करतो तर कधी तो पकडण्याचा प्रयत्न करतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप त्याला अजिबात चावत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, साप मुलाच्या आकारापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. तो आपला फणा वर करून शांतपणे बसतो आणि तो निष्पाप मुलगा त्याच्या पाठीवर, मानेवर आणि डोक्यावर चापटा करतो. ज्या वेळी मुलगा सापाला मानेने पकडतो आणि त्याला हलवतो तेव्हा कुठे साप स्वतःला सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करतो, परंतु तरीही तो मुलाला कोणतेही नुकसान करत नाही. लोक हे दृश्य पाहून आता चांगलेच हैराण झाले असून याला मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर शेअर केले जात आहे.
View this post on Instagram
हा व्हायरल व्हिडिओ @therealtarzann नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो फक्त देवच असू शकतो कारण मुलांना नेहमीच देव नैसर्गिकरित्या संरक्षित करतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलगा ठीक आहे असे दिसते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सापाला समजते की बाळाला काय चालले आहे याची काहीच कल्पना नाही”.
हेही वाचा :