दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा रंगली आहे. यावर आता थेट शरद पवार(political updates) यांनीच भाष्य केलंय. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर केवळ तीन शब्दांमध्ये दिलं आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही पवार कधी एकत्र येणार? हा सध्या सर्वांना पडलेला प्रश्न आहे.
पत्रकारांनी शरद पवारांना हा प्रश्न विचारला असता, यावर त्यांनी मला माहिती नाही, असं उत्तर दिलंय. खरं तर मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार अन् अजित पवार एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले होते. इतकंच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भात दोन्ही पक्षाच्या(political updates) नेत्यांकडून दावे-प्रतिदावे देखील केले जात आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. पवार काका-पुतणे एकत्र आल्यास पुन्हा राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सूचक विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, पक्षातील एका गटाला वाटतंय की आम्ही (अजित पवार) एकत्र यावं, तर दुसऱ्या गटाला स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावं असं वाटत आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही, पुढे कसं जायचं? याबद्दल सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांनी ठरवावं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी तीन शब्दांत दिलं उत्तर…#SharadPawar #NCP #AjitPawar #Politics pic.twitter.com/rkJETgyux8
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 31, 2025
हा प्रश्न दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा नाही. कधी ना कधी विचारसरणी एकच होती. त्याचाच हा प्रश्न आहे. मी आता राजकारणात सक्रिय राहणार नाही. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे, तो सु्प्रिया अन् अजितने घ्यावा, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येणार या फक्त चर्चा आहेत. जे काही होईल ते आपण बघालच, अशी प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणावर खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली होती. यावेळी त्यांनी जोडत याप्रकरणी अधिक बोलणं टाळलं होतं. अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे असून बडे नेते प्रफुल्ल पटेल आहेत. यांच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नाहीत. या दोघांच्या विरोधामुळेच दोन्ही गट एकत्र येत नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
हेही वाचा :
- लिव्हर आणि किडनीमध्ये जमा झालेली घाण साफ करतील 5 ड्रिंक्स
- माझं आयुष्य जगू द्या समांथा रुथ प्रभूला झाला हा गंभीर आजार
- कोविड रुग्णांची संख्या 2700 च्या पुढे, 7 मृत्यूंची नोंद; केरळ, महाराष्ट्र अन् दिल्लीला हायअलर्ट