सकाळच्या नाश्त्यात(breakfast) नेहमीच काय बनवावं सुचत नाही. नेहमीच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही साधा सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मसालेदार किंवा तेलकट तिखट पदार्थ खाल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे गॅस, अपचन किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात.

या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात (breakfast)शरीराला सहज पचन होणाऱ्या हलक्या आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटात कायम थंडावा राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये थंडगार काकडीचे सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सँडविच चवीला अतिशय सुंदर लागते आणि सँडविच खाल्यानंतर लवकर भूक लागत नाही. वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही काकडी सँडविच खाऊ शकता.जाणून घ्या काकडी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
- काकडी
- दही
- मलाई
- चिली फ्लेक्स
- ओरिगॅनो
- काळीमिरी पावडर
- चाट मसाला
- ब्रेड
- मीठ
कृती:
- काकडी सँडविच बनवताना सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात मलाई टाकून मिक्स करून घ्या.
- नंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, चाट मसाला, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- काकडी स्वच्छ धुवून साल काढा. काकडी गोलाकार पातळ चिरून घ्या.
- ब्रेडवर दह्याचे मिश्रण लावून त्यावर काकडीचे स्लाइस ठेवा आणि दुसऱ्या ब्रेड घेऊन त्यावर पुन्हा एकदा दह्याचे मिश्रण लावून काकडीवर ठेवा.
- त्यानंतर तयार केलेल्या सँडविचचे चार तुकडे करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार काकडीचे सँडविच. हे सँडविच तुम्ही नुसतेच सुद्धा खाऊ शकता.
हेही वाचा :
कोल्हापूर विनयभंगप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी घरात बोलावून मुलीशी अश्लील चाळे
महिलेने 14 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट दातांनी चावला आणि मग जे घडले ते भयंकरच
उष्णतेच्या झळा अन् गारपिटीचं संकट एकाचवेळी! हवामान खात्याचा 9 जिल्ह्यांना इशारा