मुझफ्फरपूर (बिहार): मुझफ्फरपूर जिल्ह्यातील तुर्की पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अवैध संबंधांमुळे संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या आईच्या(mother) प्रियकराची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी अविनाशला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही घटना ७ मे रोजी घडली होती. जितू राम नावाचा तरुण ७ मेपासून बेपत्ता होता. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर, २० मे रोजी जितूच्या पत्नीने तुर्की पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २३ मे रोजी काही स्थानिक नागरिकांना शेतात मानवी पाय दिसून आल्याने पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शेत खोदल्यावर जितूचा मृतदेह सापडला. कपड्यांवरून आणि बेल्टवरून मृतदेहाची ओळख पटली.
घटनेचा तपशील
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाशची आई आणि जितू राम यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध संबंध होते. पाच वर्षांपूर्वी अविनाशने आपल्या आईला(mother) जितूसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते, यामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. ७ मे रोजी रात्री १२ वाजता जितू अविनाशच्या घरी आला असता, त्याचा अविनाशशी वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. जितू शेताकडे पळून गेला असता, अविनाशने त्याच्या मागे जाऊन लाकडी बांबूने त्याच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यात जितूचा जागीच मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतर अविनाशने घरून कुदळ आणून जितूचा मृतदेह शेतातच पुरला. त्यानंतर जितूचा मोबाईल फोन फोडून झुडपात फेकून दिला, जेणेकरून कोणताही पुरावा उरू नये.

पोलिसांची कारवाई
तपासादरम्यान पोलिसांनी अविनाशवर संशय घेतला आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुदळ आणि जितूचा मोबाईल फोन जप्त केला आहे. एसडीपीओ अनिमेश चंद्र ग्यानी यांनी सांगितले की, “मृताच्या पत्नीने २० मे रोजी तक्रार दिल्यानंतर तपास सुरू झाला होता. जितू राम याचे एका विवाहित महिलेशी अवैध संबंध असल्याचे समोर आले आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.”
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस तपास सुरूच आहे.
हेही वाचा :
धावत्या ट्रेनच्या दरवाजाला लटकून करत होती व्हिडीओ शूटिंग; अचानक…
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपचा मेगा प्लॅन; ‘या’ दिवशी होणार घोषणा
‘कौटुंबिक वादातून सासूला पोत्यात घातले अन्…’; कोर्टाने सुनेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा