‘माझा मुलगा तुमच्या…’, अंगदची खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्सवर बुमराची पत्नी भडकली

27 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या(mumbai indians) आयपीएल 2025 च्या सामन्यानंतर जसप्रीत आणि संजनाचा मुलगा अंगदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरून नेटिझन्सने अंगदला ट्रोल केले आहे. यावरून क्रीडा प्रसारक आणि जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन यांची संतप्त बाजू सोशल मीडियावर दिसून आली. तिने तिचा मुलगा अंगदची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स(mumbai indians) आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान त्यांचा मुलगा टीव्ही स्क्रीनवर दिसला. यावेळी छोट्या अंगदने काही प्रतिक्रिया दिली नाही यावरून इंस्टाग्रामवरच्या काही लोकांनी त्याला ट्रोल केले.

संजनाने लोकांना काही सेकंदांच्या फुटेजवरून त्यांच्या छोट्या मुलाला ट्रोल करायचे थांबवण्याचे आवाहन केले. ट्रोलर्सना कडक संदेश देत ती म्हणाली, “आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करतो कारण इंटरनेट हे एक घृणास्पद ठिकाण आहे आणि कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात, पण कृपया हे समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो, दुसरे काही नाही,” संजनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले.

संजनाने दीड वर्षांच्या अंगदसाठी “नैराश्य” सारखे मानसिक आरोग्याशी संबंधित शब्द वापरणाऱ्या वापरकर्त्यांचा निषेध केला.”मुलाच्या संदर्भात आघात आणि नैराश्य यासारख्या शब्दांचा वापर हा आपण एक समुदाय म्हणून काय बनत आहोत याचे प्रतिबिंब आहे आणि ते खरोखरच खूप दुःखद आहे.” असे तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पुढे म्हटले आहे. ” तुम्हाला आमच्या मुलाबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे ऑनलाइन मत फक्त तेवढ्यापुरते मर्यादित ठेवा.”

रविवारी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनून इतिहास रचला. त्याच्या चार विकेट्समुळे त्याच्या संघाने लखनौवर 54 धावांनी मात करून सलग पाचवा विजय मिळवला.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक! शासकीय GR संदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय

‘कपडे काढून तू, इनरवेअरमध्ये माझ्या समोर…’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

माझ्या बायकोचं परपुरुषासोबत अश्लील कृत्य, ‘त्या’ साईटवर मी व्हिडिओ पाहिला, पतीची तक्रार