मामी बनली म्हणून आनंदाने नणदेच्या घरी गेली, पण भावोजीने संधी मिळताच डाव साधला

एका महिलेने आपल्या भावोजीवर गंभीर आरोप केला आहे. (house)आरोपी नात्यातलाच आहे. नवऱ्याच्या बहिणीच्या पतीवर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पिस्तुलच्या धाकावर आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोतवाली सेक्टर 39 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडामधील हे प्रकरण आहे. पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, वर्ष 2022 साली बागपतमध्ये राहणाऱ्या मुलासोबत माझं लग्न झालं. मी माझ्या नवऱ्यासोबत गाझियाबाद येथे राहते. माझी नणंद आणि तिचे पती नोएडाच्या सेक्टर 105 मध्ये राहतात. पीडितेने आरोप केला की, जेव्हा माझं लग्न झालं, तेव्हापासून नणदेचा पती माझ्यावर वाईट नजर ठेऊन होता.

पीडित महिलेने सांगितलं की, नोव्हेंबर 2023 मध्ये तिची नणंद बाळंत झाली. तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. त्यावेळी नणंद मला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन गेली. एकेदिवशी संध्याकाळी मी नणदेच्या घरात मी एका खोलीत होते. त्याचवेळी तिचे पती त्या खोलीत आले. त्यांनी मला मागून येऊन पकडलं. (house)माझ्या कानावर पिस्तुल ठेवली व माझ्यावर बलात्कार केला. तेव्हापासून अश्लील फोटो दाखवून तो मला ब्लॅकमेल करतोय असा आरोप पीडित महिलेने केला.

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पीडितेने या संबंधी राष्ट्रीय महिला आयोगातही तक्रार केली आहे. दरम्यान नोएडाच्याच कोतवाली सेक्टर- 113 मध्ये युवतीला लग्नाच आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच दुसरं प्रकरण समोर आलय. मॅट्रिमोनियल साइटवर मुलीची मुलासोबत मैत्री झाली होती. मुलाने मुलीला लग्नाचा आश्वासन दिलं. नंतर तिच्यावर बलात्कार केला. (house)आता मुलगा अश्लील फोटो पाठवून मुलीला ब्लॅकमेल करतोय. कोतवाली सेक्टर-113 मध्ये पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही: अजित पवारांनी हात झटकले

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ

राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा