वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात(death case) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या काही दिवसांपासून फरार असणारा निलेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळमधून निलेश चव्हाण याला अटक केली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण(death case) सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत निलेश चव्हाण याला देखील अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माहितीनुसार, निलेश चव्हाण 23 मे पासून फरार होता. आता पोलीस निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणणार आहे. आज मध्यरात्री दोन वाजता पुणे विमानतळावरती येणार असल्याची माहितीसमोर आली आहे. पुणे सत्र न्यायालयात 28 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी या प्रकरणात(death case) निलेश चव्हाणाला आरोपी करणे चुकीचे आहे कारण त्याने बाळाचा सांभाळ केला आहे. असा युक्तीवाद करत निलेश चव्हाणाने हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचा दावा केला होता.

पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. यानंतर वैष्णवीने असं टोकाचं पाऊल उचललं, यामागे हुंड्यासाठी झालेला छळ, कौटुंबिक हिंसाचार, असे आरोप करण्यात आले होते. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली होती. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्यानंतरही आणखी पैशांसाठी वैष्णवीचा छळ सुरु होता असा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा :

आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल

हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार