एकमेकांच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणांनं(husband ) विवाहित महिलेला तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठविलेत. हे मॅसेज आणि फोटो विवाहित महिलेच्या पतीनं बघितलं आणि त्याचा राग अनावर झाला. विवाहित महिलेचा पती सोपान खोब्रागडे (वय 35 वर्ष) हा घराशेजारी राहणारा तरुण मोहित घटारे याला हे मॅसेज आणि फोटो का पाठविलेत, असं विचारायला गेला.
मात्र, मोहित हा घरी नसल्यानं त्याची आई सुनाबाई घटारे (वय 45 वर्ष) याच्याशी सोपानचा वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्यानं सोपान खोब्रागडे यानं तरुणाची आई सुनाबाई यांना लाठीकाठीनं बेदम मारहाण केली.दरम्यान, या मारहाणीत अती रक्तस्त्रावामुळं उपचारादरम्यान महिलेचा लाखांदूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला(husband ). ही थरारक घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतपूर बारव्हा या गावात घडलीय. घटनेनंतर सोपान खोब्रागडे यांनं दिघोरी मोठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. मात्र 29 च्या सायंकाळी घडलेल्या या थरारक घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील वैशाली हगवणे यांचा सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं प्रकरण पुढे आल्यानंतर हुंडाबळीची एकच चर्चा रंगू लागली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतर मागील 4 महिन्यात अशा प्रकारच्या 163 गुन्ह्यांची नोंद असून यातील 130 गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून करण्यात आली आहे. तर 20 टक्के गुन्हे अजूनही प्रलंबित आहे. मागील 4 महिन्यात सासरच्या त्रासाला कंटाळून 5 महिलानी आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ठ होतं आहे.
दरम्यान, 2024 मध्ये पहिल्या चार महिन्यात अशा प्रकारचे 161 गुन्हे दाखल असून 139 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. दरम्यान, आर्थिक राजधानी मुंबईतील हुंडाबळी आणि सासरकडून महिला अत्याचाराच्या वाढलेल्या या घटना पाहता आगामी काळात या संदर्भात सरकार काय पाऊल उचलतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!
UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल
हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार