‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या लोकप्रिय योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.(installment)त्यामुळे राज्यभरातील कोट्यवधी लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सरकारकडून आलेल्या नव्या अपडेटनुसार हा हप्ता जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.ही योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १५०० रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. यावर्षी जून महिन्यापर्यंत रक्कम वेळेवर मिळाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या मदतीचा लाभ अद्याप आलेला नाही. यामुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती. सध्या राज्यात २ कोटी ३४ लाख महिला लाभार्थी आहेत. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये या योजनेतून मिळतात. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, जुलै महिन्याचा हप्ता याच महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाईल.(installment)राज्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यामुळे सध्या ही योजना सर्व महिलांपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सरकारने निवडणुका होईपर्यंत योजनेतील छाननी प्रक्रियाही स्थगित केली आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना लाभ नाकारण्याची शक्यता आहे. (installment)यासाठी केंद्र सरकारकडून प्राप्तिकर विभागाचा डेटा मागवण्यात आला होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छाननी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.सरकारच्या माहितीनुसार, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी जवळपास ५० हजार कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेतून अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, तोपर्यंत सर्व नोंदणीकृत महिलांना दरमहा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा :