मध्य-पूर्वेतील युद्धाच्या परिणामामुळे जागतिक स्तरावर तेल आणि नैसर्गिक (booking)वायूच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही इंधन व्यवस्थापनाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगबाबत केंद्र सरकारने नवे नियम लागू केले असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी लागणाऱ्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान 21 दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक होते, मात्र आता हे अंतर वाढवून 25 दिवस करण्यात आले आहे. हा निर्णय केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालय यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. या बदलामागे मुख्य उद्देश म्हणजे बाजारात होणारी साठेबाजी आणि ब्लॅक मार्केटिंग रोखणे हा आहे.

सरकारकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की देशात सध्या घरगुती (booking)गॅस, पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला नाही. तरीही भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या नव्या नियमामुळे ग्राहकांना पुन्हा सिलिंडर बुक करण्यासाठी आधीपेक्षा अधिक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक वापरासाठी असलेल्या सिलिंडरच्या दरात 114.5 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली येथे 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलिंडर आता 913 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी त्याची किंमत 853 रुपये होती.

इतर शहरांमध्येही दरवाढ दिसून येत आहे. मुंबई येथे नॉन-सब्सिडी एलपीजी (booking)सिलिंडरची किंमत 912.50 रुपये झाली आहे. कोलकाता येथे हा दर 939 रुपये असून चेन्नई मध्ये 14 किलोच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत वाढून आता 1,883 रुपये झाली आहे. या बदलांमुळे घरगुती बजेटवर तसेच व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *