उन्हात बाईक पार्क करताय? सावधान, हळूहळू खराब होऊ शकतात

देशभरात उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या कडक उन्हाचा परिणाम केवळ नागरिकांवरच नाही, तर रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकींवरही होत आहे. रोजच्या कामासाठी घराबाहेर पडणारे अनेकजण आपली बाईक तासनतास उन्हात पार्क करतात. मात्र ही सवय वाहनाच्या तब्येतीसाठी धोकादायक ठरू शकते. (temperatures) यामुळे बाईकच्या बाहेरील आणि आतील दोन्ही भागांवर परिणाम होऊन मेंटेनन्सचा खर्च वाढण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या मते, सतत उन्हात राहिल्याने बाईकच्या सीटवर सर्वाधिक परिणाम दिसून येतो. वाढलेल्या तापमानामुळे सीटचे मटेरियल कडक होऊ लागते आणि काही दिवसांत त्यावर तडे पडू शकतात. त्याचबरोबर बाईकवरील प्लास्टिक बॉडी, इंडिकेटर आणि मीटरवरील फायबर कव्हर यांचाही रंग फिका पडतो. त्यामुळे बाईकची चमक कमी होऊन ती जुनाट दिसू लागते.कडक उन्हाचा परिणाम टायर्सवरही होतो. तापमान वाढल्याने टायरमधील हवेचा दाब बदलतो. त्यामुळे पंक्चर होण्याचा किंवा टायरचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. (temperatures) यामुळे टायरची पकड कमी होऊ शकते आणि त्याचे आयुष्यही घटते. याशिवाय दररोज उन्हात उभी राहणाऱ्या बाईकचा रंगही हळूहळू फिका पडतो.

अनेकांना वाटतं की उन्हामुळे फक्त बाहेरील भाग खराब होतात. पण प्रत्यक्षात बाईकच्या आतील यंत्रणेलाही फटका बसतो. जास्त तापमानामुळे बॅटरीची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि ती लवकर डिस्चार्ज होण्याची शक्यता वाढते. इलेक्ट्रिक सिस्टमवरही त्याचा परिणाम होतो. बाईक बराच वेळ उन्हात राहिल्यास इंजिनचे तापमान वाढते आणि त्याचा थेट परिणाम इंजिन ऑइलवर होतो. (temperatures) त्यामुळे इंजिनचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो.तज्ज्ञ सांगतात की, शक्यतो बाईक सावलीत पार्क करावी. सावली नसेल तर चांगल्या दर्जाचे बाईक कव्हर वापरणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात नियमित सर्व्हिसिंग आणि वेळेवर इंजिन ऑइल बदलल्यास मोठा खर्च टाळता येऊ शकतो. थोडी काळजी घेतली तर कडक उन्हातही बाईक सुरक्षित राहते आणि अनावश्यक खर्चापासूनही बचाव होतो.

हेही वाचा

डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं

५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख बदलली