पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी 26 मेपासून ‘हा’ किल्ला 3 महिन्यांसाठी बंद, पावसाळी सुरक्षेचा निर्णय

हा ऐतिहासिक किल्ला 26 मेपासून पुढील 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (monsoon) पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून किल्ल्याची दालने आणि प्रवेश व्यवस्था तात्पुरती बंद राहणार आहे.

पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत असून मुरुड-जंजिरा येथे पावसाळी हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत 26 मेपासून पुढील तीन महिने किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. समुद्राच्या मध्यभागी वसलेला हा ऐतिहासिक जलदुर्ग पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतो,(monsoon) कारण या काळात समुद्र खवळलेला असतो आणि बोट प्रवासावरही परिणाम होतो.मुरुड-जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात वसलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. हा किल्ला आपल्या अभेद्य बांधकामासाठी आणि समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अनोख्या स्थानामुळे प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात मजबूत आणि जवळपास अजिंक्य मानल्या जाणाऱ्या किल्ल्यांपैकी तो एक मानला जातो.

किल्ल्यावर जाण्यासाठी बोट सेवा वापरावी लागते. मात्र, मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रातील उंच लाटांमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असते.(monsoon) त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून किल्ल्याची दालने आणि पर्यटकांसाठी प्रवेश तात्पुरता बंद ठेवण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जातो, जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता येईल. पर्यटकांना पावसाळ्यानंतर किल्ला पुन्हा खुला झाल्यानंतर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.इतिहास जंजिरा किल्ल्याची उभारणी सुमारे 15व्या-16व्या शतकात झाली. सुरुवातीला हा एक लाकडी किल्ला होता, जो स्थानिक कोळी समाजाने उभारला होता. नंतर सिद्दी शासकांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि दगडी बांधकाम करून त्याला भक्कम स्वरूप दिले. अनेक मराठा राजांनी, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न केले, मात्र जंजिरा किल्ला अभेद्य राहिला.


समुद्राच्या मध्यभागी बांधलेला जलदुर्ग – किनाऱ्यापासून बोटीने जावे लागते.भक्कम तटबंदी – किल्ल्याभोवती उंच आणि मजबूत भिंती आहेत.
19 बुरुज – सुरक्षेसाठी बांधलेले मजबूत बुरुज आजही पाहायला मिळतात.गोड्या पाण्याचे तलाव – समुद्रात असूनही किल्ल्यात गोड्या पाण्याची व्यवस्था आहे.विशाल तोफा – ‘कलाल बांगडी’, ‘चावरी’ आणि ‘लांडाकसम’ यांसारख्या मोठ्या तोफा येथे प्रसिद्ध आहेत.पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव किल्ला काही महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो.गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

हेही वाचा

डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं

५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख बदलली