चालकाच्या चुकीने डंपर उड्डाणपुलाला लटकला

वसई पूर्वेतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोपर फाटा येथे नव्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विचित्र आणि थरारक अपघात घडला. भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाकडून चुकून हायड्रॉलिक यंत्रणेचे बटण दाबले गेल्याने डंपरची मागील बॉडी अचानक वर उचलली गेली आणि ती थेट उड्डाणपुलाच्या लोखंडी संरचनेत अडकली. (flyover) त्यामुळे संपूर्ण डंपर उड्डाणपुलाला लटकलेल्या अवस्थेत अडकून पडला.

गुजरातच्या दिशेने जाणारा हा डंपर रात्रीच्या सुमारास कोपर फाटा येथील मोठ्या सर्कल च्या उड्डाणपुलाच्याखालून जात असताना हा प्रकार घडला. डंपरची बॉडी वर उचलली गेल्यानंतर ती उड्डाणपुलाच्या लोखंडी भागाला जोरात धडकली आणि वाहन धोकादायक अवस्थेत अडकले.अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात जीवितहानी झाली नाही. (flyover) तसेच वेगातील इतर वाहनांची या डंपरला धडक न लागल्याने अनर्थ टळला. चालकाच्या चुकीमुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने परिस्थिती नियंत्रणात राहिली.

हेही वाचा

डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं

५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख बदलली