वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या महाराष्ट्रात चांगलेच चर्चित आहे. हुंडाबळीची आणखीन एक नवीन शिकार म्हणजे वैष्णवी हगवणे. ५१ तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम आणि एक फॉर्चुनर अशा अनेक गोष्टी देऊनही वैष्णवीच्या सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला(video). आणखीन पैशाच्या हव्यासापोटी सासरचे वैष्णवीला नको ते बोलू लागले. वारंवार चारित्र्यावर शंका घेणे, मारहाण या सर्व गोष्टींनी कंटाळून अखेर तिने आपला जीव संपवण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, वैष्णवीला एक लहान मुलगा देखील आहे. ही सर्वच घटना फार दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर यासंबंधित अनेक नवनवीन खुलासे समोर आले तसेच अनेक व्हिडिओ(video) देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आले.
मागील काही काळापासून वैष्णवीच्या जंगी लग्नातील व्हिडिओ(video) इंटरनेटवर शेअर केले जात आहेत. त्यातच आता आणखीन एक असाच व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे मात्र यात फक्त वैष्णवी नाही तर वैष्णवीचा नवराही दिसून आला. चला यात काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, वैष्णवी छान नटलेली दिसून येते. तिने लाल रंगाची साडी, सुंदर मेकअप आणि हेअर स्टाईल केलेली असती. यात तिचा नवरा शशांक देखील दिसतो. व्हिडिओच्या बॅग्राऊंडला ‘दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली’ हे गाणं वाजताना दिसून आलं. यात नवरा शशांक सुरवातीला वैष्णवीच्या भांगेत कुंकू भरतो.
यांनतर पत्नी वैष्णवी खाली झुकून आपल्या नवऱ्याच्या पाया पडताना दिसून येते. हा व्हिडिओ जुना असला तरी या प्रकरणामुळे आता त्याला जोरदार शेअर केले जात आहे. याआधी वैष्णवीनं घेतलेल्या उखाण्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणावर आता पोलिसांनी तपास सुरु केला असून या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नवरा शशांक, नणंद करीश्मा आणि सासू लता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @vaishanvi_3000_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शमध्ये , ‘हरणाची शिकार कुत्र्याने केली’ असे लिहिले आहे. व्हिडिओला युजर्सचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून आता हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहे.
तर अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे गुंड आहेत. मी पिंपरी चिंचवड ला राहते. हे गुंड बंदुका घेऊन फिरतात. ह्यांना सर्व घाबरतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “Reality किती वेगळी असते. Videos अणि pictures मध्ये किती सुखी ani समृद्ध वाटते हे couple”.
हेही वाचा :
धावत्या ट्रेनच्या दरवाजाला लटकून करत होती व्हिडीओ शूटिंग; अचानक…
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपचा मेगा प्लॅन; ‘या’ दिवशी होणार घोषणा
‘कौटुंबिक वादातून सासूला पोत्यात घातले अन्…’; कोर्टाने सुनेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा