मोठी बातमी: अखेर छगन भुजबळ मंत्रिमंडळात दाखल होणार

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची(cabinet) शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या सकाळी 10 वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडणार असल्याचं देखील सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले छगण भुजबळ अखेर मंत्रिमंडळात दाखल होणार आहेत.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाची(cabinet) वाट पाहून असलेले भुजबळ जेव्हा डावललं गेलं त्यानंतर आपली नाराजी अनेकवेळा बोलून देखील दाखवली होती. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून भुजबळांकडं पाहिलं जातं. ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्यात ते पुढं असतात. असं असतानाही त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर मोठी नाराजी ओबीसी समाजाकडून व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता भुजबळ हे उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील असं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळ यांना मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप झाले. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांच खात आता भुजबळांकडं जाणार असल्याचं दिसतय.

हेही वाचा :

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मोठा डाव; ‘तोच’ फॉर्म्युला वापरणार

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणात मटका किंगची एन्ट्री! गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराचा मोठ्या पक्षात पक्षप्रवेश