नागपूर : प्रियकरासाठी एका मोलकरीणने मालकाचा विश्वासघात केला(crime). ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये काढून ठेवलेल्या दोन हिरेजडित अंगठ्या चोरी करून पसार झाली. त्या अंगठ्या तिने प्रियकराला भेट दिल्या. तक्रार मिळताच जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवून महिलेचा शोध सुरू केला. मोबाईलचा सीडीआर आणि लोकेशनच्या आधारावर तिला हुडकून काढत पश्चिम बंगालमधून अटक केली. तर तिच्या प्रियकरालाही नाशिक येथून अटक करण्यात आली. मारिया सूर्यराव सुक्का (वय 25) आणि पवन भास्कर बडगुजर (वय 30, रा. सप्तश्रृंगी चौक, सिडको, नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी नुपूर अनिरुद्ध अग्रवाल रा. विनायकनगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. मारिया ही मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. ती विनायकनगर परिसरात भाड्याने राहात होती.
जवळपास वर्षभरापूर्वी ती नुपूर यांच्या घरी मोलकरीण म्हणून कामाला होती(crime). दरम्यान, तिने काम सोडले होते. गेल्या 17 मे रोजी नुपूर यांचे पती व आई-वडील यांना कामाने गावाला गेले होते. नुपूर एकट्याच घरी होत्या. त्यामुळे नुपूर यांनी मारियाला तीन दिवसांसाठी त्यांच्या बाळाची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवले होते. 18 मे रोजी मारियाने नुपूरला नाशिक येथे राहणारा प्रियकर पवन याच्यासोबत लग्न करायचे असल्याने 50 हजार रुपये उसने मागितले होते. मात्र, नुपूरने पैसे देण्यास नकार दिला होता. रात्री 10 वाजताच्या सुमारास मारिया बाळाची देखभाल करण्यासाठी बेडरूममध्ये गेली. यावेळी तिला ड्रेसिंग टेबलच्या ड्राव्हरमध्ये दोन हिरे जडित अंगठ्या दिसल्या. तिने त्या अंगठ्या चोरी केल्या आणि मुलाला झोपवून बाहेर आली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मेच्या सकाळी घरकाम आटोपून मारीया निघून गेली आणि परत आली नाही. इकडे मारिया यांनी ड्राव्हर उघडले असता त्यांच्या अंगठ्या गायब होत्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मारिया चोरी करताना दिसली. त्यांनी जरीपटका ठाण्यात मारियाविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून मारियाचा शोध सुरू केला. चोरी करण्यापूर्वी ती कोणाच्या संपर्कात होती, याचा शोध घेण्यासाठी तिच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. तसेच तिचे लोकेशन शोधले असता ते पश्चिम बंगालचे खरगपूर रेल्वे स्टेशन येथे मिळाले. तत्काळ एक पथक खरगपूरला रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मारियाला शोधून काढत तिला अटक करण्यात आली.
हेही वाचा :
आषाढी वारीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: ‘या’ वाहनांना टोलमाफी!
UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 ऑगस्टपासून बॅलन्स चेकच्या नियमांमध्ये मोठा बदल
हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच ‘या’ चित्रपटात दिसणार