अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे(political updates) ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे बंधू आणि माजी अभियंता संजय कौसल यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जामीनावर बाहेर असलेल्या महेंद्र पवार या आरोपीनं 60 वर्षीय संजय कौसल यांची हत्या केली.
संजय कौसल हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते म्हणून निवृत्त झाले होते. अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलं असून धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
भारतीय राष्ट्रिय काँग्रेस(political updates) पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान भाऊ आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अभियंता 60 वर्षीय संजय कौसल यांची अकोल्यातील रणपिसे नगर परिसरात काल रात्री हत्या करण्यात आली आहे.
जुन्या वैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याची परिसरात चर्चा आहेय..बारा ज्योतिर्लिंग मंदिर जवळ एका अपार्टमेंट जवळ लोखंडी शस्त्राने डोक्यावर प्रहार करून सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांची हत्या करण्यात आली आहे.
गंभीर अवस्थेत असलेल्या पीडित संजय कौशल यांना नागरिकांनी अकोला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले होते मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अद्याप या हत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहिती नुसार हल्लेखोर आरोपी सराईत गुन्हेगार असून एका प्रकरणात तुरुंगात होता. मात्र सध्या तो जामीनावर बाहेर आला होता.
Akola Congress Leaders Brothers Murder | अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या भावाची जुन्या वादातून हत्या #akola #congress #murderscase #zee24taas pic.twitter.com/mePuCMDdhE
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 3, 2025
सोमवारी सायंकाळी त्याची संजय कौसल यांच्याशी भेट झाली. सुरवातीस त्यांच्यात बोलचाल होवुन जुना वाद उफाळून आलाय आणि आरोपीने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने गंभीर वार केले..पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :