आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले आहे. (face )यामध्ये त्यांनी काही विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख केला आहे, जिथे महिलांनीच नव्हे, तर पुरुषांनीही जास्त काळ थांबू नये, अन्यथा जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. आपण कधी फिरायला, कधी नातेवाईकांकडे, तर कधी मित्रमैत्रिणींकडे जातो. उशीर झाला किंवा कुणी आग्रह केला की आपण तिथे थांबतो. काही जागा अनेकांच्या ‘फेव्हरेट’ असतात, त्यामुळे लोक मुद्दाम तिथे राहण्यासाठी जातात. पण चाणक्यांनी काही जागा अशा सांगितल्या आहेत, जिथे चुकूनही फार काळ थांबू नये, मग तुम्ही एकटे जा, मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत, कुटुंबासोबत किंवा तुमच्या जोडीदारासोबत.
चाणक्यांच्या मते , जिथे शिक्षणाचा सन्मान केला जात नाही, अशा ठिकाणी जास्त काळ थांबू नका. चांगल्या आयुष्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, कारण ते व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. शिक्षण हे असे शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मोठमोठ्या लढाया जिंकू शकता आणि जीवनात प्रगती करू शकता. जिथे ज्ञानाला महत्त्व दिले जात नाही, तिथे व्यक्तीचा बौद्धिक विकास थांबतो आणि भविष्यातील प्रगतीला अडथळे येतात.
जिथे चांगल्या गुणांचा सन्मान केला जात नाही, अशा ठिकाणीही जास्त काळ राहू नका, असे चाणक्य सांगतात. चांगल्या आयुष्यासाठी सद्गुण असणे अत्यंत गरजेचे आहे. (face )जिथे सद्गुणांचा सन्मान केला जात नाही, तिथे व्यक्तीच्या बुद्धीचा विकास थांबतो आणि गुणांच्या अभावामुळे आयुष्यही पुढे जात नाही. अशा ठिकाणी राहिल्यास व्यक्तीमध्ये नकारात्मकता वाढू शकते आणि त्याचे चारित्र्यही बिघडू शकते.
कठीण काळात नातेवाईक, मित्रमैत्रिणीच तुमची साथ देतात आणि तुम्हाला आधार देतात. त्यामुळे, जिथे हे लोक नाहीत किंवा जिथे तुम्हाला कोणाचाही आधार मिळणार नाही, अशा ठिकाणी जास्त काळ थांबू नका. त्याचबरोबर, हे लोक आहेत, तिथेही फार वेळ राहू नका, कारण जास्त काळ एकाच ठिकाणी राहिल्याने तुमचा सन्मान कमी होऊ शकतो. (face )स्वाभिमान राखून आणि योग्य मर्यादा पाळूनच वागणे महत्त्वाचे आहे.
याव्यतिरिक्त, चाणक्यांनी असेही म्हटले आहे की, जिथे उपजीविकेचे साधन नाही, म्हणजेच जिथे तुम्हाला काम मिळणार नाही किंवा आपले जीवन चालवण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळणार नाही, अशा ठिकाणीही जास्त काळ राहू नका. कारण यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि जीवन कठीण होते. जिथे भीतीचे वातावरण आहे, जिथे लोक सुरक्षित नाहीत, अशा ठिकाणीही थांबू नये.या सर्व ठिकाणी जास्त काळ थांबल्यास व्यक्तीला मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे चाणक्य नीती सांगते. त्यामुळे, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा :