उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर (shocking incident) हादरला आहे. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सासूची जावयाने गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ही घटना फुलसंदा गंगदास गाव येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, (shocking incident) सजल आणि भावना यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ दोघे घरापासून दूर राहत होते. मात्र सुमारे दोन महिन्यांपूर्वी ते पुन्हा गावात परतले आणि तेथे राहू लागले. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला.
वाद वाढल्यानंतर भावनाने (shocking incident) आपल्या आई बबली यांना फोन करून माहिती दिली. मुलगी अडचणीत असल्याचे समजताच बबली तातडीने तिच्या घरी पोहोचल्या. त्यांनी जावई सजलला शांत राहण्याचा सल्ला दिला आणि मुलीवर हात उचलू नकोस अशी समज दिली. मात्र यामुळे सजल अधिकच संतापला. रागाच्या भरात त्याने आधी पत्नी भावनाला मारहाण केली. मुलीला वाचवण्यासाठी आई बबली मध्ये पडताच सजलने जवळ ठेवलेली 315 बोरची देशी बंदूक काढली आणि थेट बबली यांच्या डोक्यात गोळी झाडली.
गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. गावकरी (shocking incident) तातडीने घटनास्थळी जमा झाले. गंभीर जखमी अवस्थेत बबली यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच (shocking incident) पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी सजलचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेली 315 बोरची देशी बंदूकही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी