N. Chandrababu Naidu यांच्या (encourage population) नेतृत्वाखालील Government of Andhra Pradesh ने लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की राज्यात गेल्या काही वर्षांपासून जन्मदर सातत्याने कमी होत आहे. हीच परिस्थिती पुढेही कायम राहिली तर भविष्यात राज्यात तरुणांची संख्या घटण्याची शक्यता आहे. तरुणांची संख्या कमी झाली तर त्याचा परिणाम कामगार शक्तीवर आणि क्रयशक्तीवरही होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकार नव्या लोकसंख्या धोरणावर काम करत आहे.

या नव्या धोरणानुसार राज्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्याच्या जन्माला (encourage population) प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देण्याची योजना तयार करण्यात येत आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावेळी कुटुंबाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या अपत्यासाठी अतिरिक्त सुविधा देण्याचाही निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे.

तिसऱ्या मुलाचा जन्म (encourage population) झाल्यानंतर त्या मुलाला पहिल्या पाच वर्षांपर्यंत दर महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच त्या मुलाला १८ वर्षांपर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा देण्याचाही प्रस्ताव आहे. सरकारचा असा विश्वास आहे की आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबे तिसऱ्या अपत्याचा विचार करतील आणि त्यामुळे राज्यातील कमी होत असलेल्या जन्मदरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. या सर्व सुविधांचा विचार केला तर तिसऱ्या अपत्यासाठी सरकारकडून एकूण सुमारे ८५ हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.

दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जन्मदर कमी होत असल्याची चिंता (encourage population) व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकसंख्या कमी करण्याऐवजी लोकसंख्येचे संतुलन राखण्यावर राज्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आंध्र प्रदेश सरकारचा हा प्रस्ताव देखील त्याच दिशेने उचललेले एक पाऊल मानला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत या योजनेला अंतिम स्वरूप देण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर येत्या १ एप्रिलपासून ही योजना राज्यभरात लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेमुळे राज्यात जन्मदर वाढण्यास आणि भविष्यातील लोकसंख्येचे संतुलन राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *